17 वी आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून
लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहून वेळापत्रक ठरणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बहुप्रतीक्षित 17 वी आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असल्याचे लीगचे चेअरमन अरुण धुमल यांनी मंगळवारी सांगितले.
यावर्षी सार्वत्रिक निवडणुका याच सुमारास होणार असल्या तरी संपूर्ण स्पर्धा भारतातच खेळविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एप्रिल-मे या दरम्यान सार्वत्रिक निवडणुका होण्याची अपेक्षा असल्याने आयपीएलच्या या आवृत्तीचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण पहिल्या पंधरा दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक घोषित करण्यात येणार आहे.
‘आयपीएलची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू करण्याचा आमचा विचार आहे. सरकारी संघटनांसमवेत आम्ही यासंदर्भात काम करीत असून प्रारंभिक वेळापत्रक आम्ही प्रथम जाहीर करणार आहोत. ही संपूर्ण स्पर्धा भारतातच खेळविण्यात येणार आहे,’ असे धुमल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पुढील महिन्याच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर होण्याची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याची अपेक्षा असून 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळविला जाईल. विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामीची लढत आयर्लंडविरुद्ध न्यूयॉर्कमध्ये 9 जून रोजी होणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात अमेरिका व कॅनडा यांच्यातील लढतीने 1 जून रोजी होईल.
यापूर्वी 2009 मध्ये आयपीएल स्पर्धा पूर्णपणे विदेशात (दक्षिण आफ्रिकेत) खेळविण्यात आली होती. 2014 मध्ये निवडणुकीच्या कारणास्तव आयपीएलचे काही सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आले होते. 2019 मध्ये मात्र निवडणुका असूनही संपूर्ण आयपीएल स्पर्धा भारतातच खेळविण्यात आली होती.
आदल्या वर्षीच्या अंतिम लढतीत खेळलेल्या संघांतील सामन्याने आयपीएलची सुरुवात करण्याची परंपरा असल्याने चेन्नई सुपरकिंग्स व गुजरात टायटन्स यावेळी आमनेसामने असतील. या आवृत्तीसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा लिलाव झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून केकेआरने त्याला 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
Home महत्वाची बातमी 17 वी आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून
17 वी आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून
लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहून वेळापत्रक ठरणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बहुप्रतीक्षित 17 वी आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार असल्याचे लीगचे चेअरमन अरुण धुमल यांनी मंगळवारी सांगितले. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका याच सुमारास होणार असल्या तरी संपूर्ण स्पर्धा भारतातच खेळविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. एप्रिल-मे या दरम्यान सार्वत्रिक निवडणुका होण्याची अपेक्षा असल्याने आयपीएलच्या या आवृत्तीचे वेळापत्रक अद्याप […]