Jalgaon News : जर्मन तंत्रज्ञानाने रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; 85 कोटींच्या निधीतील कामे सुरु : भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Jalgaon News : जर्मन तंत्रज्ञानाने रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; 85 कोटींच्या निधीतील कामे सुरु : भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Jalgaon News : जर्मन तंत्रज्ञानाने रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण; 85 कोटींच्या निधीतील कामे सुरु : भारत लाईव्ह न्यूज मीडिया

Jalgaon News : धनवीरसिंग ठाकूर , महाराष्ट्र शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या विकास कामांच्या ८५ कोटींच्या निधीतून जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणास सुरवात झाली आहे. त्याअंतर्गत जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण नुकतेच सुरु झाले असून त्यासाठी ‘सिक्स्डफॉर्म’ या जर्मन धर्तीवरील तंत्रज्ञानाने रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. २१ कोटींच्या खर्चाचे हे काम तीन टप्प्यात होणार असल्याचं प्रयोजन आहे. (Concreting of roads with German technology in jalgaon news)

प्रगतिशील महाराष्ट्र राज्यातील जळगाव शहरातील रस्ते हा अनेक वर्षां पासून सुरु असलेला प्रलंबित प्रश्न आहे.
अनेक वर्षे खड्ड्यांमधून जीव मुठीत घेऊन वावरणाऱ्या जळगावकरांना गेल्या वर्षभरापासून नवीन रस्त्यांचे दर्शन होऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या वर्षात लोकसभा, त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका आहे. त्यामुळेच बहुधा शासकीय यंत्रणेला आपली मळभ दूर करून नागरिकांना त्यांच्या हक्काचे मूलभूत सुविधे पैकी निदान रस्ते तरी देण्याची कृपा स्थानिक प्रशासन पूर्ण शर्थीने करीत आहेत.

जळगाव महानगर पालिका सभागृहाची मुदत गेल्या सप्टेंबरमध्येच संपल्याने आगामी वर्षात नंतरच्या टप्प्यात जळगाव मनपाचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खड्ड्यात गेलेले जळगाव शहर खड्ड्यांमधून बाहेर काढण्यासाठी पूर्ण शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान मंत्री गिरीश महाजनांच्या सहकार्याने गेल्या काही काळात शहरातील रस्त्यांसाठी दोन टप्प्यात प्रथम १०० व नंतर ८५ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला.

सध्या मंजूर झालेल्या विकासकामातील ८५ कोटींतून कामे सुरु !

महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या जळगाव शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांच्या आधुनिक कॉंक्रिटीकरणासाठी ८५ कोटींचा निधी मंजूर केला असून त्यात प्रमुख रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ चौक या जवळपास तीन किलोमीटर टप्प्यातील रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामास दोन दिवसांपूर्वी काव्यरत्नावली चौकातून जोरात सुरवात झाली आहे.

काव्यरत्नावली चौकातील कामाचे प्रारूप कसे असेल ?

८५ कोटींच्या निधीतून काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक या तीन साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम २१ कोटी रुपये खर्च करून होणार आहे. धुळ्याच्या ‘एस.बी. देशमुख एजन्सीला’ हे काम मिळाले असून या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १० मीटर रुंद असे काम होईल.

एकूण रस्ता बहुतांश ठिकाणी ३० मीटरचा असून रस्त्याच्या दुतर्फा साइड पट्टी व मध्ये दुभाजकाचा त्यात समावेश आहे. या रस्त्याचे काम विविध टप्प्यात होईल. त्यात काव्यरत्नावली चौक ते रॉयल पॅलेस, रॉयल पॅलेस ते आकाशवाणी चौक, आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्य चौक व पुढे स्वातंत्र्य चौक- शिवतीर्थ, शिवतीर्थ ते टॉवर चौक अशा प्रकारे बांधण्याचे प्रयॊजन आहे.

कामाच्या रस्त्यावरील वाहतूक नियमनासाठी उपाय योजना काय ?

या प्रत्येक टप्प्यात सुरवातीला रस्त्याची एक बाजू बंद करून त्या बाजूचे काम होईल. दुसरी बाजू नागरिकांच्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी खुली राहील. पहिल्या बाजूचे काम पूर्ण झाले, रस्ता पूर्णपणे ‘ओके’ झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम सुरु करून हाती घेण्यात येईल. यामुळे नागरिकांच्या वाहन वाहतुकीचे आवहंगमन सुरळीत होऊन खोळंबाही होणार नाही.

काँक्रीट साठी वापरलं जाणार ‘सिक्स्डफॉर्म’ तंत्रज्ञान

जळगाव शहरात प्रथमच एवढ्या प्रमुख व मोठ्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरणाचे काम होतेय. त्यामुळे त्यासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. जर्मन तंत्रज्ञानाच्या धर्तीवर ‘सिक्स्डफॉर्म’ यंत्रणेद्वारे कॉंक्रिटीकरण होत आहे. यात एका बाजूच्या दहा मीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण दोन भागात होऊ शकते.

लोखंड धातू बांधणीचे काम मनुष्यबळाने करून , सिमेंट कॉंक्रिट पसरविण्याचे व लेव्हलिंगचे काम या यंत्रणेद्वारे केले जाते. अन्य मशिनच्या तुलनेत याद्वारे काम सोपे व जलदगतीने लवकर होते. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा आहे. याआधी अजिंठा चौक ते मानराज मोटर्सपर्यंत श्री.श्री.इन्फ्रास्ट्रक्चरने विकसित केलेल्या महामार्गाच्या कामासाठी अशा प्रकारची यंत्रणा वापरण्यात आली आहे.

दिवाळी नंतर निवडणूक सुरु होण्या आधीच जळगाव करांचे रस्त्यांचे प्रश्न हळू हळू मार्गी लागत असल्यामुळे काही प्रमाणात जळगाव शहर वासियांना दिलासा मिळाला असून येणाऱ्या काळात शहराच्या विकासासाठी शासन यंत्रणा किती प्रयत्नशील राहील ह्या कडे मतदात्यांचे लक्ष लागून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Add Comment