सांबरा येथे आज आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

अमिर मोहम्मदी इराण, किरण भगत यांच्यात प्रमुख लढत : कुस्तीशौकीनांसाठी गॅलरीची खास व्यवस्था बेळगाव : सांबरा येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त सांबरा कुस्तीगीर संघटना व महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन शुक्रवार दि. 24 रोजी विमानतळजवळील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बेळगावात प्रथमच […]

सांबरा येथे आज आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

अमिर मोहम्मदी इराण, किरण भगत यांच्यात प्रमुख लढत : कुस्तीशौकीनांसाठी गॅलरीची खास व्यवस्था
बेळगाव : सांबरा येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त सांबरा कुस्तीगीर संघटना व महालक्ष्मी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन शुक्रवार दि. 24 रोजी विमानतळजवळील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बेळगावात प्रथमच कुस्तीशौकीनांना कुस्ती पाहण्यासाठी खास गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. मनोरंजक कुस्तीत देवा थावा यांची प्रात्यक्षिक कुस्ती होणार आहे. या मैदानात प्रमुख कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी काका पोवार तालमीचा किरण भगत पुणे व आंतरराष्ट्रीय मल्ल इराणचा अमिर मोहम्मदी यांच्यात होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर गंगावेस कोल्हापूर व राष्ट्रीय पदक विजेता पवनकुमार हरियाणा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेता रविंद्रकुमार हरियाणा व डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती भोसले व्यायाम शाळा सांगलीचा प्रशांत शिंदे व दिल्लीचा दिल्लीचा सुमीत हु•ा यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व उदय दिल्ली, सहाव्या क्रमांकाची किर्तीकुमार कार्वे व विश्वजीत रूपनर कराड, सातव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व संजू इंगळगी, आठव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व सुनील कवठेपिरान, नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व पवन चिक्कदिनकोप, दहाव्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक इंगळगी व केशव पोवार कोल्हापूर याशिवाय जवळपास 70 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. सध्या बेळगाव परिसरात पावसाचे वातावरण असल्या कारणाने कुस्ती मैदान दुपारी 2 वाजता सुरू करण्यात येणार आहे. याची दखल सर्व मल्लांनी घ्यावी. वेळेवर उपस्थित न राहिल्यास उपस्थित मल्लाला विजयी घोषित करण्यात येणार आहे.