निरीक्षक प्रशल देसाई यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची मागणी
म्हापसा : आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरणी हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश मानला म्हणून त्यांना निलंबनास सामोरे जावे लागले. आदेश न मानल्यास त्यांना राखिव दलात पाठविले जाते. हा आदेश वरिष्ठ अधिकारी तथा डिजीपी जसपाल सिंग यांनी दिला होता, असे निरीक्षकांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना सेवेत पुन्हा सामावून घ्यावे, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी हडफडे येथे पत्रकारांशी बोलताना केली.
हणजूण पोलीस निरीक्षकांनी आपला अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वऊपात सादर केला आहे आणि ते आपल्या अहवालाशी ठाम राहिले आहेत. वरिष्ठांकडून आदेश आल्यावर त्या वरिष्ठाच्या आदेशाला अनुसरून आपण काम केले आहे. आपण निलंबित झालो कारण आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश मानला म्हणून. त्यांनी तो पाळला म्हणून निरीक्षकांना निलंबित करण्यात आले. तसा अहवालही निरीक्षकांनी चौकशी अधिकाऱ्यांना सादर केला. त्यामुळे निरीक्षक प्रशल देसाई यांना पुन्हा त्या जागी आणणे गरजेचे आहे आणि गृहखात्याने याबाबत चौकशी करावी, असेही लोबो म्हणाले.
Home महत्वाची बातमी निरीक्षक प्रशल देसाई यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे
निरीक्षक प्रशल देसाई यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची मागणी म्हापसा : आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरणी हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश मानला म्हणून त्यांना निलंबनास सामोरे जावे लागले. आदेश न मानल्यास त्यांना राखिव दलात पाठविले जाते. हा आदेश वरिष्ठ अधिकारी तथा डिजीपी जसपाल सिंग यांनी दिला होता, असे निरीक्षकांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना सेवेत […]