भारत-उझ्बेक महिला फुटबॉल सामना आज

वृत्तसंस्था /ताष्कंद सध्या भारताचा महिला फुटबॉल संघ उझबेकच्या दौऱ्यावर आहे. आता शुक्रवारी येथे भारत आणि उझबेक यांच्यातील मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाची सत्वपरीक्षा राहिल. फिफाच्या महिलांच्या फुटबॉल मानांकनात भारत 66 व्या तर उझबेक 48 व्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांमध्ये यापूर्वी 11 सामने झाले असून त्यापैकी केवळ […]

भारत-उझ्बेक महिला फुटबॉल सामना आज

वृत्तसंस्था /ताष्कंद
सध्या भारताचा महिला फुटबॉल संघ उझबेकच्या दौऱ्यावर आहे. आता शुक्रवारी येथे भारत आणि उझबेक यांच्यातील मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाची सत्वपरीक्षा राहिल. फिफाच्या महिलांच्या फुटबॉल मानांकनात भारत 66 व्या तर उझबेक 48 व्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांमध्ये यापूर्वी 11 सामने झाले असून त्यापैकी केवळ 1 सामना भारताने जिंकला आहे. तर गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या एएफसी ऑलिम्पिक पात्रता दुसऱ्या फेरीतील लढतीत उझबेकने भारताचा 3-0 असा पराभव केला होता. तर 2003 साली झालेल्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाने उझबेकवर 6-0 असा मोठा विजय मिळविला होता. या भारतीय महिला फुटबॉल संघाला लेनगाम चाओबा देवीचे मार्गदर्शन मिळत आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या 23 खेळाडूंसाठी दोन आठवड्याचे सरावाचे शिबिर आयोजित केले होते.