आयसीसीच्या टी-20 मानांकनात भारत अग्रस्थानी

वृत्तसंस्था /दुबई विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघ अग्रस्थानावर आहे. भारतीय संघाने पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते. गुरुवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-20 ताज्या मानांकन यादीत भारत 264 रेटींग गुणासह पहिल्या स्थानावर आहे. […]

आयसीसीच्या टी-20 मानांकनात भारत अग्रस्थानी

वृत्तसंस्था /दुबई
विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 ते 29 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी घोषित करण्यात आलेल्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघ अग्रस्थानावर आहे. भारतीय संघाने पहिल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते. गुरुवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-20 ताज्या मानांकन यादीत भारत 264 रेटींग गुणासह पहिल्या स्थानावर आहे. तर या यादीत आतापर्यंत दोन वेळेला टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणारा विंडीजचा संघ चौथ्या स्थानावर आहे. 2012 आणि 2016 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद विंडीजने पटकावले होते. अलिकडेच विंडीजने झालेल्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 3-0 असा पराभव केला आहे. 2021 साली टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणार ऑस्ट्रेलियाचा संघ 257 रेटींग गुणासह दुसऱ्या तर विद्यमान विजेता इंग्लंड 254 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. विंडीज 252 गुणासह चौथ्या, न्यूझीलंड 250 गुणासह पाचव्या स्थानावर आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांनी समान 244 गुण मिळविले असले तरी डेसिमल पॉईंट्समध्ये पाकने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे. विंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विंडीजचा सलामीचा सामना गयाना येथे 2 जून रोजी पापुआ न्यू गिनीआ बरोबर खेळविला जाईल.