बांगलादेशविरुद्ध आज भारताने सावध राहण्याची गरज
वृत्तसंस्था/ नॉर्थ साउंड (अँटिग्वा)
भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या स्पर्धांच्या बाबतीत एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या शत्रुत्वाचा तणावपूर्ण अंक आज शनिवारी पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ टी-20 विश्वचषकाच्या सुपर एट सामन्यात आमनेसामन येणार आहेत. आपले स्टार फलंदाज फॉर्ममध्ये येण्याची दोन्ही संघांना अपेक्षा लागून राहिलेली असेल.
दोन्ही संघांमध्ये आजवर झालेल्या सामन्यांचा इतिहास जरी भारताच्या बाजूने असला, तरी बांगलादेश आकस्मिक धक्का देण्यासाठी ओळखला जातो आणि रोहित शर्माच्या संघाला त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारत हा जेतेपदाचा मुख्य दावेदार आहे यात शंकाच नाही. त्यांनी पहिल्या सुपर एट सामन्यात अफगाणिस्तानविऊद्ध अप्रतिम कामगिरी करून ते स्पष्ट केले आहे. त्यांच्या राहिलेल्या दोन सामन्यांदरम्यान फक्त प्रवासाचा एक दिवस असून ज्या खेळाडूंनी आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही त्यांना पुढे सूर गवसेल, अशी आशा त्यांना असेल.
त्या यादीत अग्रस्थानी विराट कोहली आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी आहे. या दोघांनीही चांगली सुऊवात केली आहे. परंतु त्यांना निर्णायक खेळी करता आलेली नाही. त्यांनी वेग वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, परंतु त्यात ते फारसे यशस्वी झालेले नाहीत. संघाचा आणखी एक दबावाखाली असलेला सदस्य म्हणजे डावखुरा शिवम दुबे. त्याला मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये षटकार खेचण्यासाठी विश्वचषक संघात निवडले गेले होते. मात्र तो त्या अपेक्षांना अद्याप जागलेला नाही. तो अद्याप पार्टीला आला नाही. अमेरिकेविऊद्ध नाबाद 31 धावांची खेळी त्याने केली खरी, परंतु त्या सामन्यात सूर्यकुमार यादवमुळे शेवटी फरक पडला.
दुबेला आणखी एक अपयश मिळाल्यास संघ व्यवस्थापनाला मधल्या फळीत संजू सॅमसनचा विचार करण्यास भाग पाडू शकते. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील फलंदाजीतील सर्वांत मोठी सकारात्मक बाजू म्हणजे हार्दिक पंड्याला सूर गवसला. गोलंदाजीच्या आघाडीवर डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला स्पर्धेतील पहिली संधी दिल्यानंतर भारत संघरचना कायम राखण्याची अपेक्षा आहे. कॅरेबियनमध्ये भारताचे एकमेव लक्ष्य म्हणजे चषक जिंकणे आहे आणि बांगलादेशविऊद्धची भक्कम कामगिरी त्या दिशेने आणखी एक पाऊल असेल. 24 जून रोजी त्यांची ऑस्ट्रेलियाविऊद्ध आणखी खडतर लढत होणार आहे.
संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीत संघर्ष कराव्या लागलेल्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पराभवानंतर आज जिंकणे आवश्यक आहे. पॉवर हिटर्सचा अभाव त्यांना त्रास देत आहे. सलामीवीर लिटन दास आणि तन्झिद खान यांच्या खराब कामगिरीने बांगलादेशच्या संकटात आणखी भर पडली आहे. मुस्तफिझूर रहमानच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, परंतु लेगस्पिनर रिशाद हुसेनला फिरकी विभागात अधिक आधाराची आवश्यकता आहे.
संघ-बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, लिटन दास, शकिब अल हसन, तौहीद ह्रदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, झाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम, सोऊम सरकार.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा.
Home महत्वाची बातमी बांगलादेशविरुद्ध आज भारताने सावध राहण्याची गरज
बांगलादेशविरुद्ध आज भारताने सावध राहण्याची गरज
वृत्तसंस्था/ नॉर्थ साउंड (अँटिग्वा) भारत आणि बांगलादेश यांच्यात मोठ्या स्पर्धांच्या बाबतीत एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या शत्रुत्वाचा तणावपूर्ण अंक आज शनिवारी पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ टी-20 विश्वचषकाच्या सुपर एट सामन्यात आमनेसामन येणार आहेत. आपले स्टार फलंदाज फॉर्ममध्ये येण्याची दोन्ही संघांना अपेक्षा लागून राहिलेली असेल. दोन्ही संघांमध्ये आजवर झालेल्या सामन्यांचा इतिहास जरी […]