भारत आज झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ हरारे
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज बुधवारी होणार असून भारताच्या विश्वचषक विजेत्या संघात सहज फटकेबाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला जागा द्यायची की, आक्रमक अभिषेक शर्माला कायम राखायचे हा निर्णय घेणे कठीण जाणार आहे.
जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या आगमनाने भारतीय संघाला मालिकेतील या सर्वांत महत्त्वाच्या सामन्यात एक मजबूत स्वरूप प्राप्त झाले आहे. वरील सर्व जण गेल्या महिन्यात विश्वजेतेपद पटकावणाऱ्या मुख्य संघाचा भाग होते. पाहुणे दुसऱ्या सामन्यात 100 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधल्यानंतर आता त्यावर कळस चढविण्यास उत्सुक असतील.
डावखुरा सलामीवीर अभिषेकने त्याच्या दुसऱ्या सामन्यात 46 चेंडूंत शतक झळकावून पुरेशी कामगिरी केली आहे. तथापि, एक शतक आणि चार अर्धशतकांसह 17 टी-20 सामन्यांमध्ये 161 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट असलेल्या जैस्वालचा कर्णधार शुभमन गिलच्या सलामीच्या जोडीदाराच्या स्थानावर भक्कम दावा असेल. त्यामुळे वरील दोघांपैकी एकटा तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
राजस्थान रॉयल्ससाठी साधारणपणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा संजू सॅमसन 5 व्या क्रमांकावर येऊ शकतो, तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड कदाचित चौथ्या क्रमांकावर उतरू शकेल. ‘प्लेइंग इलेव्हन’मधील बदलांचा विचार करता जैस्वाल बी. साई सुदर्शनच्या जागी येण्याची शक्यता आहे, ज्याची केवळ पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती. ध्रुव जुरेलच्या जागी सॅमसन येईल. दुबे हा रियान परागच्या जागी खेळण्याची शक्यता आहे.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना थोडीशी अतिरिक्त उसळी मिळते आणि रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळणे तिथे खूप कठीण बनलेले आहे. कर्णधार सिकंदर रझा वगळता झिम्बाब्वेचे इतर फलंदाज भारतीय आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुरेसे चांगले दिसत नाहीत. सलामीच्या सामन्यात 13 धावांच्या धक्कादायक पराभवानंतर जागे झालेल्या भारतासाठी पाच तज्ञ गोलंदाजांविना खेळणे फायदेशीर ठरले. कर्णधार गिल दोन सामन्यांत चमकू न शकल्यानंतर आज चांगली खेळी करण्यास उत्सुक असेल.
संघ-भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, रियान पराग, ध्रुव जुरेल, खलील अहमद, तुषार देशपांडे.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंदाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट काईया, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे माऊमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, अंतुम नक्वी, रिचर्ड एन्गरावा, मिल्टन शुम्बा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 4.30 वा.
Home महत्वाची बातमी भारत आज झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकण्यास सज्ज
भारत आज झिम्बाब्वेविरुद्धची मालिका जिंकण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ हरारे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आज बुधवारी होणार असून भारताच्या विश्वचषक विजेत्या संघात सहज फटकेबाजी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला जागा द्यायची की, आक्रमक अभिषेक शर्माला कायम राखायचे हा निर्णय घेणे कठीण जाणार आहे. जैस्वाल, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या आगमनाने भारतीय संघाला मालिकेतील या सर्वांत महत्त्वाच्या सामन्यात एक मजबूत स्वरूप […]