राकसकोप-बेळगाव बसफेऱ्या वाढवा
प्रवासी-विद्यार्थ्यांची मागणी : महिला प्रवाशांची हेळसांड
बेळगाव : राकसकोप-बेळगाव मार्गावर अपुऱ्या बससेवेमुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. बससेवा अनियमित झाल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा तोंडावर आल्याने राकसकोप-बेळगाव मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राकसकोप-बेळगाव बसवर यळेबैल, बेळगुंदी, बाकनूर, बेनकनहळ्ळी, सोनोली आदी गावातील प्रवाशांचा ताण आहे. मात्र, गावासाठी एकच बस सेवा देत असल्याने प्रवाशांना चेंगराचेंगरीने प्रवास करावा लागत आहे. काहीवेळा बसफेऱ्या बंद केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. महिलांचा मोफत प्रवास सुरू झाल्यापासून सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बस वाहतूक प्रवाशांना नकोशी होऊ लागली आहे.
शक्ती योजना प्रारंभापासून बससेवा विस्कळीत
जून 11 पासून शक्ती योजनेला प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून बस वाहतूक इतर प्रवाशांना त्रासदायक ठरू लागली आहे. परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्यामुळे बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. राकसकोप बसला गणेशपूरपासून बेळगुंदीपर्यंत प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करावा लागत आहे.
Home महत्वाची बातमी राकसकोप-बेळगाव बसफेऱ्या वाढवा
राकसकोप-बेळगाव बसफेऱ्या वाढवा
प्रवासी-विद्यार्थ्यांची मागणी : महिला प्रवाशांची हेळसांड बेळगाव : राकसकोप-बेळगाव मार्गावर अपुऱ्या बससेवेमुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. बससेवा अनियमित झाल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेला सामोरे जावे लागत आहे. परीक्षा तोंडावर आल्याने राकसकोप-बेळगाव मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राकसकोप-बेळगाव […]
