3 अपत्ये असणाऱ्यांना हाउसिंग सोसायटीची निवडणूक लढता येणार नाही : हायकोर्ट

3 अपत्ये असणाऱ्यांना हाउसिंग सोसायटीची निवडणूक लढता येणार नाही : हायकोर्ट

हाउसिंग सोसायटीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 3 अपत्ये असणाऱ्या व्यक्तीस कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. या व्यक्तीने माहिती लपवून ठेवत जिंकली तरी, सिद्ध झाल्यास या लोकप्रतिनिधीला अपात्र करण्याचा नियम आहे. हाच नियम गृहनिर्माण निवडणुकीलाही लागू होतो, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुंबई उच्च नायालयाच्या न्या. अविनाश घराटे यांच्या एकल पीठाने हा महत्वाचा निर्वाळा दिलाय. तीन अपत्ये असणाऱ्या एका गृहनिर्माण सोसायटीमधील अध्यक्षाला अपात्र ठरवत उपनिंबधकाचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणात महाराष्ट्र को ऑप. हौ. सोसायटी कायद्यात दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्याचे पद रद्द करण्याची तरतूद नसल्याचा दावा सिंग यांना यांनी केला होता. मात्र, अपनिंबधकाचे आदेश योग्य असल्याचा युक्तिवाद अॅड. उदय वारुंजीकर यांनी केला.काय आहे नेमकं प्रकरण?मुंबईतील कांदिवली चारकोपच्या एकता नगर गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष पवनकुमार नंदकिशोर सिंग यांच्या अध्यक्षपदाला दीपक तेजल आणि रामाचल यादव यांनी आव्हान दिले होते. पवनकुमार नंदकिशोर सिंग यांना तीन अपत्ये आहेत. त्यांना अपात्र करण्याची मागणी उपनिबंधकाकडे केली होती. त्यानंतर त्यांना सिंग यांना अपात्र केले होते. त्यानंतर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.हेही वाचानालेसफाईबाबत महापालिकेने केलेल्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल
NNMC कडून पार्किंग समस्या सोडवण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण सुरू

Go to Source