इश्क विश्क रिबाउंड’मध्ये पशमीना

इश्क विश्क रिबाउंड’मध्ये पशमीना

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता ऋतिक रोशनची चुलत बहिण पश्मीना रोशन ‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित शाहिद कपूरचा चित्रपट ‘इश्क विश्क’चा सीक्वेल आहे.
इश्क विश्क रिबाउंडच्या ट्रेलरमध्ये मित्रांची कहाणी दाखविण्यात आली आहे, ज्यांच्यात त्रिकोणी प्रेमकहाणी दिसून येईल. हा चित्रपट 21 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इश्क विश्क रिबाउंड चित्रपटात पश्मीना रोशनसोबत रोहित सराफ आणि जिबरान खान मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. पश्मीना यात सान्या नावाची भूमिका साकारत आहे.
याचबरोबर कुशा कपिला, सुप्रिया पिळगावकर, आकर्ष खुराना, शिल्पा विशाल शेट्टी, शताफ फिगार, अनीता कुलकर्णी आणि शीबा च•ा हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण अविनाश धर्माधिकारी यांनी केले आहे. तर या चित्रपटात शाहिद कपूर हा कॅमियो भूमिकेत दिसून येणार असल्याची चर्चा आहे.