90 रुपयांमध्ये घर, वास्तव्यासाठी मिळणार 27 लाख

नंदनवनासारख्या ठिकाणी मिळतेय ऑफर एखाद्या निवांत ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यावर तेथेच कायमस्वरुपी वास्तव्य करण्याची इच्छा मनात दाटून येते. परंतु काही कारणांमुळे हे शक्य नसते. परंतु जर कुणी तुम्हाला पैसे देऊन अशा ठिकाणी राहण्याची ऑफर देत असेल तर तुम्ही ती स्वीकाराल का? सुंदर किनाऱ्यांनी वेढलेल्या नंदनवनासारख्या ठिकाणी राहण्याची इच्छा कुणाला नसणार? मग तेथे तुमची राहण्या अन् जेवण्याची […]

90 रुपयांमध्ये घर, वास्तव्यासाठी मिळणार 27 लाख

नंदनवनासारख्या ठिकाणी मिळतेय ऑफर
एखाद्या निवांत ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यावर तेथेच कायमस्वरुपी वास्तव्य करण्याची इच्छा मनात दाटून येते. परंतु काही कारणांमुळे हे शक्य नसते. परंतु जर कुणी तुम्हाला पैसे देऊन अशा ठिकाणी राहण्याची ऑफर देत असेल तर तुम्ही ती स्वीकाराल का?
सुंदर किनाऱ्यांनी वेढलेल्या नंदनवनासारख्या ठिकाणी राहण्याची इच्छा कुणाला नसणार? मग तेथे तुमची राहण्या अन् जेवण्याची उत्तम व्यवस्था असेल तर अनेक लोक तेथे स्थलांतरित होण्यास तयार होतील. इटलीचा एक प्रांत अशीच अनोखी ऑफर देत आहे. एका सुंदर ठिकाणी स्थायिक होण्यासाठी सरकार 27 लाख रुपये देत आहे.
इटलीच्या टस्कनी प्रांतात पलायन आणि घटणाऱ्या लोकसंख्येमुळे सरकार एक आकर्षक ऑफर देत आहे. याचे नाव ‘रेसिडेन्सी इन द माउंटेन्स 2024’ ठेवण्यात आले आहे. याच्या अंतर्गत जर कुणी या प्रांतात स्वत:चे घर खरेदी करत असेल तर त्याला 9 लाखापासून 27 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. ज्या ठिकाणी घर उपलब्ध करून दिले जाणार आहे तेथे केवळ 119 लोकच राहत आहेत. टस्कन माउंटेन्स इटलीच्या काही सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.
प्रशासनाने गावांमध्ये लोकसंख्या वाढविण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. याच्या अंतर्गत केवळ एक युरो म्हणजेच 90 रुपयांमध्ये घर मिळू शकते. परंतु याच्यासोबत काही अटी जोडण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी अर्ज करणारा इसम इटालियन किंवा युरोपीय महासंघाचा नागरिक असणे आवश्यक आहे. बाहेरील लोकांना 10 वर्षांचा रेसिडेन्शियल परमिट घ्यावा लागणार आहे. घराच्या नुतनीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के भार सरकार उचलणार आहे. या पूर्ण योजनेचा उद्देश स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे, कारण लोक स्थायिक झाले तरच रोजगार वाढणार आहे.