स्पेनचा राफेल नदाल अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ बॅस्टेड (स्विडन) एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या नोर्डीया खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालने एकेरीची अंतिम फेरी गाठताना अॅड्यूकोव्हिकचा पराभव केला. या स्पर्धेतील नदाल आणि अॅड्यूकोव्हिक यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सव्वादोन तास चालला होता. या लढतीत नदालने अॅड्यूकोव्हिकचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. तब्बल 2 वर्षानंतर नदालने एटीपी टूरवरील […]

स्पेनचा राफेल नदाल अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ बॅस्टेड (स्विडन)
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या नोर्डीया खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालने एकेरीची अंतिम फेरी गाठताना अॅड्यूकोव्हिकचा पराभव केला.
या स्पर्धेतील नदाल आणि अॅड्यूकोव्हिक यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सव्वादोन तास चालला होता. या लढतीत नदालने अॅड्यूकोव्हिकचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. तब्बल 2 वर्षानंतर नदालने एटीपी टूरवरील स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. 2022 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील अंतिम सामन्यात कास्पर रुडचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले होते. नदालचे हे पॅरिस स्पर्धेतील 14 वे विजेतेपद ठरले. नदालचा या स्पर्धेतील अंतिम सामना नूनो बोर्जेस बरोबर होणार आहे. बोर्जेसने उपांत्य सामन्यात थियागो टिरेंटीवर 6-3, 6-4 अशी मात करत अंतिम फेरी गाठली आहे. नदाल आणि बोर्जेस यांच्यातील अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.