राशिभविष्य

राशिभविष्य

मागच्या वेळेला खजानामध्ये मी जे टेबल दिले होते, बऱ्याच लोकांनी मला विचारले की हा डेटा  किंवा ही माहिती तुमच्याकडे तुम्ही जमा केलेली आहे का?   त्याचे सरळ उत्तर आहे नाही. कारण मी  लिहीत असताना मीच जमा केलेली माहिती  वाचकांसमोर मांडणे हे मला तितकेसे ठीक वाटले नाही. जे टेबल यावेळी ही मी रिपीट केले आहे. हे टेबल  आचार्य  के. के. जोशी, जे  आधुनिक  वैदिक ज्योतिषशास्त्राच्या  भीष्माचार्यांचे  म्हणजे  प्राध्यापक  के. एन. राव  यांचे शिष्य आहे, त्यांनी संशोधन  करून  प्रसिद्ध केलेल्या  पत्रकावरून  साभार घेतलेले आहे.   यातील आणखी एक मुद्दा म्हणजे असलेली माहिती किंवा इन्फॉर्मेशन ही ऑथेंटिक म्हणजे प्रामाणिक असायलाच हवी, असा माझा अट्टहास असतो.म्हणून वाचकांच्या माहितीकरता भारतीय विद्या भवन जे दिल्ली येथे स्थित आहे त्याबद्दल काही माहिती सांगतो. मी के. एन. राव सरांना वेदिक ज्योतिषशास्त्राचे भीष्माचार्य का म्हणालो हेही सांगतो. म्हणजे मी हवेत बोलत नाही आहे याची खात्री तुम्हाला पटेल. भारतीय विद्या भवनच्या  के. एन. राव इन्स्टिट्यूट ऑफ ज्योतिष, नवी दिल्ली, वेदांचे पवित्र ज्ञान देते आणि त्यांच्या समर्पित प्राध्यापकांद्वारे उच्च शिस्तीचे ज्योतिषी तयार करते जे जागतिक मानके पूर्ण करतात,  विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या उच्च आणि नैतिकदृष्ट्या मजबूत बनवतात, ज्यामुळे मानव जातीच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली जाते. इथे शास्त्रीय संकल्पनांवर आधारित ज्योतिषशास्त्राचे काटेकोरपणे पालन करतो. बृहत पराशर होरा शास्त्रात दिलेले उपाय वगळता, ग्रहशांती, काल सर्प दोष/शांती.
आजकाल विविध सोशल मीडियावर प्रचलित असलेल्या उपायांवरील मतांना हे विद्यापीठ कधीच समर्थन देत नाही. के. एन. राव सरांबद्दल काय सांगावे? ते भारतीय विद्या भवन, नवी दिल्ली येथे ज्योतिष अभ्यासक्रमाचे सल्लागार आहेत. 1993 मध्ये अमेरिकन कौन्सिल ऑफ वैदिक अॅस्ट्रॉलॉजीच्या दुसऱ्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून, त्यांचे आता भारतात हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत आणि यूएसएमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थी आहेत. सरांच्या अथक प्रयत्नांमुळेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हैदराबाद उच्च न्यायालयाचा निर्णय उलटवला आणि ळउण् ला भारतीय विद्यापीठांमध्ये वैदिक ज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली. समस्त जोतिषांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत.
या टेबलमधील  माहितीबद्दल  थोडक्मयात सांगायचे झाले तर 115  जोडप्यांच्या  कुंडल्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर मंगळदोषाला मंगळ दोष का म्हणायचे नाही  हे प्रूव्ह करणारे किंवा साबित करणारे हे टेबल आहे. दोघांच्याही कुंडलीमध्ये  एकाच जागेला मंगळ असलेल्या बारा जोडप्यांपैकी सहा आनंदी आहेत आणि सहा दु:खी आहेत. थोडक्मयात सहा समाधानी आहेत आणि सहा असमाधानी आहेत गणितात जरा पैकी जरी अभ्यास असला  तर सहज कळेल की कुठलाही नियम  किंवा असे म्हणूया की कुठलाही स्टेटस नियम स्टेटसफिकल नियम सिद्ध होण्याकरता  कमीत कमी 70 टक्के  केसेसमध्ये तो नियम लागू व्हावा लागतो. सहा आणि सहा याचा अर्थ  50 टक्के आणि 50 टक्के म्हणजे 50 टक्के अगदी त्याचप्रमाणे मंगळ असलेली जोडपीसुद्धा असमाधानी आहेत हे लक्षात घ्या.  या पुढच्या कॉलममध्ये  दोन्ही  वराच्या आणि  वराच्या आणि वधूच्या दोघांच्याही कुंडलीत मंगळ आहे पण तो वेगवेगळ्या घरात आहे अशा 28 जोडप्यांपैकी पंधरा समाधानी आहेत आणि तेरा असमाधानी आहेत लक्षात घ्या 15 समाधानी आहेत  आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिसऱ्या कॉलममध्ये तिसऱ्या ओळीमध्ये वधू आणि वरापैकी एकाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे, पण दुसऱ्याच्या कुंडलीत मंगळ दोष नाही अशा 75 लोकांपैकी 57 जोडपी ही आनंदी आहेत आणि केवळ अठरा जोडपी असमाधानी आहेत. या माहितीला जर नीट बघितले तर सहजपणे कळते की, मंगळदोष असो वा नसो कोणत्याही प्रकारे समाधान आणि असमाधान हे केवळ मंगळ दोषावरती किंवा मंगळ योगावरती अवलंबून नाही.
(मित्रहो बरेचसे ज्योतिषी हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांना तितकेसे महत्त्व देत नाहीत. पाश्चात्य ज्योतिष या ग्रहांबरोबर इतर अनेक गोष्टींना खूप सिरीयस्ली घेते. येत्या एक जूनला हर्षल ग्रह वृषभमध्ये  प्रवेश करेल. त्याचा सर्वसाधारण प्रभाव सगळ्या राशींवर तसा कसा असेल हे अत्यंत थोडक्मयात समजून घेऊया. मेष – थोडे आर्थिक  नुकसान होण्याची शक्मयता आहे. मनाविऊद्ध घटना घडू शकतात. वृषभ-मनाला काबूत ठेवले पाहिजे. मनस्थिती बिघडण्याची शक्मयता आहे,  मिथुन- कर्ज होण्याची चिन्हे दिसतात.  कर्क- यश आणि अपयश यांचा  लपंडाव असेल. सिंह-आर्थिकबाबतीत चांगले फळ मिळू शकते. कन्या-अध्यात्माकडे कल वाढेल. यात्रा कराल. तूळ-सांभाळून राहावे लागेल, तब्येत बिघडू शकते. वृश्चिक- पार्टनरबरोबर मतभेद होऊ शकतात. धनु-आर्थिक लाभ पण तब्येतीच्या समस्या. मकर- घरातील सदस्यांबरोबर मतभेद होतील. कुंभ-कौटुंबिक समस्या. मीन-पैशांच्या बाबतीत नशीबवान असाल, पण मन:शांती बिघडेल.)
मेष
कोणत्या ना कोणत्या कारणासाठी खर्च होत राहील. होईल तेवढे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. योग्य असेल त्या ठिकाणी खर्च करा. वाहन चालवत असल्यास सांभाळून आणि रहदारीचे सर्व नियम पाळून वाहन चालवा. अध्यात्माकडे वळण्याचा विचार चालला असेल तर उत्तम विचार आहे. अध्यात्माकडे वळा. कोर्टात काही केस चालली असल्यास शक्मयतो तारीख पुढे घाला.
उपाय: हनुमान चालीसाचा पाठ करा.
वृषभ
जोडीदाराची चांगली साथ मिळेल. ज्यांची विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी प्रयत्न जरूर करावेत. चांगला जोडीदार मिळेल. जे अजून शिक्षण घेत असतील त्यांची शिक्षणात चांगली प्रगती होण्याची शक्मयता आहे. आपल्या गुऊंचे आपल्याला चांगले कृपाशीर्वाद लाभण्याची शक्मयता आहे. फक्त आपल्याला ‘ग’ ची बाधा होणार नाही ना याकडे जरा लक्ष द्या.
उपाय: मंदिरात जाऊन दत्तगुऊंचे दर्शन घ्या.
मिथुन
कौटुंबिक सुख मिळण्याची शक्मयता आहे. म्हणजेच कुटुंबाबरोबर वेळ चांगला जाण्याची शक्मयता आहे. आपल्या बोलण्याचा कुटुंबावर, आपल्या नातेवाईकावर चांगला प्रभाव पडेल. वडिलोपार्जित काही संपत्ती असल्यास मिळण्याची शक्मयता आहे. सर्वाना आपल्या चांगुलपणाने आपलेसे करून घ्या. आपल्याला लेखनाची जर आवड असेल तर काही लेखन आपल्याकडून घडण्याची शक्मयता आहे.
उपाय: रोज तुळशीला पाणी घाला
कर्क
या आठवड्यात आपल्याला काही संघर्ष करावा लागण्याची शक्मयता आहे. पण आपल्याला आपल्या भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. छोटासा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. कुठलेही साहस मात्र करायला जाऊ नका. ऑफिसमध्ये असाल तर आपल्या कामाचे कौतुक होण्याची शक्मयता आहे. वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. खाण्यावर मात्र बंधन ठेवा व कानाला जपा.
उपाय: दर मंगळवारी मारुतीला 11 प्रदक्षिणा घाला.
सिंह
वाहन सुख या आठवड्यात आपल्याला पुरेपूर मिळण्याची शक्मयता आहे. आईच्या सहवासात वेळ छान जाईल. आईकडून कोडकौतुकही करून घ्याल. आपण काही विद्या मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ती पूर्ण कराल. नवीन घर बांधण्याच्या किंवा घेण्याच्या विचारात असाल तर प्रयत्न करण्यास हरकत नाही. यश मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय: सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्या.
कन्या
संततीची थोडी काळजी वाटण्याची शक्मयता आहे. पण काळजीचे कारण नाही. त्यांची शिक्षणात चांगली प्रगती होईल. अचानक धनलाभाची शक्मयता वाटते. एखादे लॉटरीचे तिकीट काढून आपले नशीब आजमावायला हरकत नाही. मन थोडे फार चंचल राहील. मनाला थोडा आवर घालण्याचा प्रयत्न करा किंवा कोणत्यातरी कार्यात त्याला गुंतवून ठेवा.
उपाय: गुरुची उपासना करा.
तूळ
तब्येतीची काळजी घ्या. नोकर चाकरावर अति विश्वास ठेवू नका. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी मान मिळेल, अशा ठिकाणीच शक्मयतो जा. अन्यथा अपमानाला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. कोणती तरी चिंता आपल्याला सतावत राहण्याची शक्मयता आहे. पण चिंता करू नका.
उपाय: कुलदेवतेची उपासना करा.
वृश्चिक
जोडीदाराची चांगली साथ मिळेल. काही मतभेद अथवा काही कारणावरून जोडीदाराकडून मन दुखावले गेले असल्यास ते सर्व मिटून जातील. आणि सहजीवन चांगले होईल. आपल्या बुद्धीला चालना मिळून आपल्याकडून चांगले कार्य घडेल. आपला काही स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्यात उत्तम प्रगती होण्याची शक्मयता आहे किंवा तशी चिन्हे आहेत.
उपाय: मुक्मया प्राण्यांना पाणी पाजा.
धनु
तब्येतीची काळजी घावी लागेल. वाहन जपून चालवा. अचानक धनलाभाची शक्मयता आहे. पण ते धन योग्य व सन्मार्गाने आले तरच स्वीकारा. अन्यथा गोत्यात येण्याची शक्मयता आहे. मन थोडे अस्वस्थ, थोडे चंचल राहील. सांभाळून रहा. स्त्रीकडून द्रव्यलाभ संभवतो. परिवारातील सदस्याची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ला पण जपावे लागेल. सांभाळा.
उपाय: घरातून बाहेर पडताना कपाळावर गंध लावून बाहेर पडा.
मकर
या आठवड्यात आपल्या हातून काही धार्मिक कृत्ये घडण्याची शक्मयता आहे. आपल्याला असे काही काम करावेसे वाटले तर विचारात वेळ घालवू नका. ते काम करून पुण्य गाठीशी बांधून घ्या. तपाचरण करा. आपल्याला सत्संग घडण्याची शक्मयता आहे. तीर्थयात्रा घडण्याची देखील शक्मयता आहे. कदाचित काही सूचक स्वप्नेही पडतील. वृद्धांचे आशीर्वाद मिळतील.
उपाय: महादेवाची उपासना करा.
कुंभ
कष्टाविण फळ ना मिळते या उक्तीचा प्रत्यय आपल्याला या आठवड्यात येण्याची शक्मयता आहे. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर आणखी थोडे प्रयत्न करावे लागतील. नोकरीत असाल तर पदोन्नती मिळविण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न आणि आपले काम चोख व प्रामाणिकपणे करावे लागेल. नोकराबरोबर माणुसकीने वागा.
उपाय:- महालक्ष्मीची आराधना करा.
मीन
भावंडांच्या भेटी गाठीत आणि मित्रांच्या सहवासात हा आठवडा आपल्याला छान जाईल. काही उंची वस्तूंची खरेदी होईल अथवा भेटवस्तू म्हणून मिळतील. काही लाभ मिळतील. मानमरातब मिळेल. सभा समारंभात आपण सहभागी होण्याची शक्मयता आहे. त्यातूनही सन्मान मिळण्याची शक्मयता आहे. एकूण हा आठवडा आपल्याला छान जाण्याची शक्मयता आहे.
उपाय: शक्मय होईल तेवढा परोपकार करा.