मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरातील शाळा-कॉलेजना आज सुटी

मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरातील शाळा-कॉलेजना आज सुटी

प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या 4 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. मंगळवार दि. 4 रोजी आरपीडी कॉलेज येथे मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. यामुळे या परिसरात असणाऱ्या शाळांना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.
यामध्ये एसकेई भंडारी कन्नड माध्यम शाळा, एसकेई भंडारी मराठी माध्यम शाळा, डिव्हाईन प्रॉव्हिडन्स इंग्लीश माध्यम शाळा, स्वाध्याय विद्यामंदिर शाळा, टिळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श शाळा, केएचपीएस नं. 5, एमएचपीएस नं. 9 टिळकवाडी, जी. जी. चिटणीस हायस्कूल, हेरवाडकर हायस्कूल, गोमटेश विद्यापीठाच्या सर्व शाळा व केएलएस पब्लिक स्कूल, जैन शाळा, डिव्हाईन किड्स या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे केएलएस गोगटे कॉलेज, आर. एल. लॉ कॉलेज, आरपीडी कॉलेज, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे.