हेमंत निंबाळकर पुन्हा माहिती-जनसंपर्क आयुक्त

बेंगळूर : आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची पुन्हा राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी या खात्यातून त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर आयएएल अधिकारी विकास किशोर सुरळकर यांच्यावर माहिती-जनसंपर्क आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आता हेमंत निंबाळकर यांची पुन्हा माहिती आणि जनसंपर्क खात्यात वर्णी लागली आहे. हेमंत […]

हेमंत निंबाळकर पुन्हा माहिती-जनसंपर्क आयुक्त

बेंगळूर : आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची पुन्हा राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी या खात्यातून त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर आयएएल अधिकारी विकास किशोर सुरळकर यांच्यावर माहिती-जनसंपर्क आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. आता हेमंत निंबाळकर यांची पुन्हा माहिती आणि जनसंपर्क खात्यात वर्णी लागली आहे. हेमंत निंबाळकर हे 1998 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख, बेंगळूर सीसीबी पोलीस आयुक्त, बेंगळूर पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि सीआयडीचे आयजीपी आदी विविध पदे सांभाळली आहेत.