देशातील 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

या वर्षी मान्सूनने भारतात जोरदार धडक दिली आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर आला आहे. तसेच आसाम आणि गुजरात तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. पावसामुळे दोन राज्यांमध्ये 30 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा …

देशातील 20 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

या वर्षी मान्सूनने भारतात जोरदार धडक दिली आहे, ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर आला आहे. तसेच आसाम आणि गुजरात तसेच दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. पावसामुळे दोन राज्यांमध्ये 30 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीपासून हिमाचल प्रदेशपर्यंत गेल्या एक महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

हवामान विभागाने आज एक महत्त्वाचे हवामान अपडेट जारी केले असून, दिल्ली-एनसीआरसह देशातील 20 पेक्षा अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील सात दिवस पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. तसेच देशभरात हवामान सक्रिय आहे, त्यामुळे विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

 

देशभरात पावसाची स्थिती-

हवामान विभागानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, अंदमान आणि निकोबार, कर्नाटक, केरळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशा, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड आणि इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source