सिसोदियांच्या अर्जावर 20 एप्रिलला सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारी न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आता 20 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सोमवारी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर सुनावणी झाली असून सिसोदिया यांची बाजू ऐकून घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आपल्याला जामीन मंजूर करण्यात […]

सिसोदियांच्या अर्जावर 20 एप्रिलला सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारी न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात आता 20 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सोमवारी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर सुनावणी झाली असून सिसोदिया यांची बाजू ऐकून घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी सिसोदिया यांनी केली होती. सिसोदिया यांना सीबीआयने गेल्यावर्षी 26 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी वारंवार प्रयत्न केला असला तरी त्यांना कायमस्वरुपी जामीन मिळू शकलेला नाही. मात्र, न्यायालयाने त्यांना आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती.