माँटे कार्लो टेनिस स्पर्धेत सित्सिपस विजेता

वृत्तसंस्था/ मोनॅको एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसने एकेरीचे जेतेपद मिळविताना कास्पर रुडचा अंतिम सामन्यात पराभव केला. सित्सिपसने ही स्पर्धा आतापर्यंत तीन वेळा जिंकली आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात सित्सिपसने कास्पर रुडचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. 2024 च्या टेनिस हंगामातील सित्सिपसचे हे पहिले जेतेपद आहे. एटीपीच्या […]

माँटे कार्लो टेनिस स्पर्धेत सित्सिपस विजेता

वृत्तसंस्था/ मोनॅको
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसने एकेरीचे जेतेपद मिळविताना कास्पर रुडचा अंतिम सामन्यात पराभव केला. सित्सिपसने ही स्पर्धा आतापर्यंत तीन वेळा जिंकली आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात सित्सिपसने कास्पर रुडचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. 2024 च्या टेनिस हंगामातील सित्सिपसचे हे पहिले जेतेपद आहे. एटीपीच्या मानांकनात तो आता 7 व्या स्थानावर राहिल. सित्सिपसने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 11 स्पर्धा जिंकल्या आहेत. कास्पर रुडने या स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती.