मुष्टियुद्ध स्पर्धेत हरियाणा सांघिक विजेता
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
येथे झालेल्या उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत हरियाणाने सांघिक जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत हरियाणाच्या स्पर्धकांनी एकूण 19 पदकांची कमाई केल्याने मुले आणि मुलींच्या विभागातील त्यांनी विजेतेपद हस्तगत केले.
गेल्या खेपेला झालेल्या या राष्ट्रीय उपकनिष्ठांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत हरियाणाने मुलींच्या विभागात विजेतेपद मिळविले होते. यावेळी त्यांनी पुन्हा या गटातील जेतेपद स्वत:कडे राखताना 7 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 10 पदकांसह 64 गुण मिळविले.
मुलींच्या विभागात विविध वजन गटात हरियाणाच्या 7 पैकी 6 स्पर्धकांनी अंतिम लढती 5-0 अशा गुण फरकाने जिंकल्या. मुलींच्या विभागात 61 किलो गटात दियाने दिल्लीच्या याशिकाचा पराभव करत सुवर्णपदक मिळविले. तसेच या स्पर्धेतील ती सर्वोत्तम मुष्टियोद्धी म्हणून घोषित करण्यात आली. हरियाणाच्या भूमी, निश्चल शर्मा, राखी, नैतिक, नव्या, आणि सुखरित यांनी विविध वजन गटात सुवर्णपदके घेतली. मुलींच्या विभागात दिल्लीने 34 गुणासह दुसरे स्थान तर महाराष्ट्रने 31 गुणासह तिसरे स्थान मिळविले. दिल्लीने 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्यपदके तर महाराष्ट्रने 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्यपदके मिळविली.
मुलांच्या विभागात हरियाणाच्या स्पर्धकांनी 62 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले. त्यांनी 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदकाची कमाई केली. उत्तराखंडने 3 सुवर्ण आणि 3 रौप्यपदकासह 34 गुण घेत दुसरे स्थान तर उत्तरप्रदेशने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये विविध राज्यांचे सुमारे 615 स्पर्धक सहभागी झाले होते.
Home महत्वाची बातमी मुष्टियुद्ध स्पर्धेत हरियाणा सांघिक विजेता
मुष्टियुद्ध स्पर्धेत हरियाणा सांघिक विजेता
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा येथे झालेल्या उपकनिष्ठांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत हरियाणाने सांघिक जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत हरियाणाच्या स्पर्धकांनी एकूण 19 पदकांची कमाई केल्याने मुले आणि मुलींच्या विभागातील त्यांनी विजेतेपद हस्तगत केले. गेल्या खेपेला झालेल्या या राष्ट्रीय उपकनिष्ठांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत हरियाणाने मुलींच्या विभागात विजेतेपद मिळविले होते. यावेळी त्यांनी पुन्हा या गटातील जेतेपद स्वत:कडे राखताना 7 सुवर्ण, […]