H9N2 Virus : चीनमधल्या नवीन व्हायरसचा प्रभाव भारताला किती धोका ? एक्स्ल्युजिव रिपोर्ट : भारत लाईव्ह न्यूज मीडिया

H9N2 Virus : चीनमधल्या नवीन व्हायरसचा प्रभाव भारताला किती धोका ? एक्स्ल्युजिव रिपोर्ट : भारत लाईव्ह न्यूज मीडिया

H9N2 Virus : चीनमधल्या नवीन व्हायरसचा प्रभाव भारताला किती धोका ? एक्स्ल्युजिव रिपोर्ट : भारत लाईव्ह न्यूज मीडिया

मुंबई : धनवीरसिंग ठाकूर , H9N2 Virus China Cases चीनच्या उत्तर भागात पसरत नव्याने आढळून येत असलेल्या घातक H9N2 व्हायरसची प्रकरणे आणि श्वसनाच्या आजारासंबंधी झालेल्या उद्रेकावर भारत सरकार सध्या बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत शुक्रवारी स्पष्टीकरण दिलं आहे.

भारतीय आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलंय की, चीनमधून नोंदवलेले एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणे आणि श्वासोच्छवासाच्या आजारांचा भारतात कमी धोका आहे. उत्तर चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वासोच्छवासाच्या आजारामध्ये वाढ होत असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार लक्षात येतंय.

चीनमधील H9N2 संबंधी जागतिक आरोग्य संघटना अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन द्वारा दखल घेतली आहे. या आजाराची मानसाला होत असलेली लागण आणि मृत्यूदर दोन्ही रेशो कमी आहेत. भारताच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केलं की, भारत सध्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. विशेषतः कोरोनानंतर देशाने आरोग्यविषयक पायाभूत सुविधा सज्ज केलेल्या आहेत.

चीनमध्ये नव्याने श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जगासमोर नवीनच भीतीचं संकट उभं राहिलं आहे. कोरोना विषाणू चीनमधूनच आल्याचं सांगितलं जात होतं. आता लहान मुलांमध्ये पसरणारा श्वसनाचा आजार चीनमध्ये बळावत आहे. त्यामुळे इतर देश धास्तावले असून जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याची दखल घेतलीय. कोरोना कोव्हीड व्हायरस मुळे आधीच जर्जर झालेल्या नागरी देशांनी मात्र आपल्या नागरिकांच्या आरोग्या साठी साथींच्या आजारावर बारीक लक्ष ठेवून वेळीच योग्य त्या उपाय योजना अमलात आणल्यापाहिजेत. पुढील होणाऱ्या सर्व घडामोडी वर प्रसार माध्यमांचे लक्ष लागून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया !

Add Comment