विविध कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी

 गुरुमहिमा, गुरुभजन, रुद्राभिषेक, पाद्यपूजा, सत्यनारायण पूजा, महाआरतीचे आयोजन बेळगाव : गुरु-शिष्याचं नातं दृढ करणारी गुरुपौर्णिमा रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध ठिकाणी गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दादा महाराज अष्टेकर यांची पाद्यपूजा, जोतिबा देवाची पूजा आणि सत्यनारायण पूजा करण्यात आली. सकाळी 9 वाजता […]

विविध कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा साजरी

 गुरुमहिमा, गुरुभजन, रुद्राभिषेक, पाद्यपूजा, सत्यनारायण पूजा, महाआरतीचे आयोजन
बेळगाव : गुरु-शिष्याचं नातं दृढ करणारी गुरुपौर्णिमा रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध ठिकाणी गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग देवस्थान
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त दादा महाराज अष्टेकर यांची पाद्यपूजा, जोतिबा देवाची पूजा आणि सत्यनारायण पूजा करण्यात आली. सकाळी 9 वाजता देवाला रुद्राभिषेक घालण्यात आला. सकाळी 11 वाजता दादा महाराज अष्टेकर यांची पाद्यपूजा, सत्यनारायण पूजा, महाआरती करण्यात आली. यावेळी बेळगावसह कोल्हापूर, गोवा, खानापूर आदी ठिकाणांहून भाविक उपस्थित होते. भक्तांना तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री रुद्रकेसरी मठामध्ये गुरुपौर्णिमा
येथील श्री रुद्रकेसरी मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. जगद्गुरु श्री सिद्धारुढ महाराज यांच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक करण्यात आला. तसेच मठातील श्रीहरी गुरु महाराज यांच्या चरणांची पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती झाली. यावेळी महाराजांनी प्रवचन दिले. भजन, गुरुपाठ आणि कथन कार्यक्रमानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पतंजली योग समितीतर्फे गुरुपौर्णिमा
पतंजली योग समिती बेळगावतर्फे रविवारी नेहरूनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री कॉलेजच्या सभागृहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या निमित्ताने सामूहिक गुरु भजन, योग नृत्य सादर करण्यात आले. सुनीता नंदन्नवर यांनी गुरु महिमेचे महत्त्व विषद केले. याबरोबरच प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या विद्या दीदी, महादेवी दीदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु व शिष्याचे पारंपरिक महत्त्व विषद केले. यावेळी विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मोहन बागेवाडी, मगनभाई पटेल, पुरुषोत्तम पटेल, अंजली गाडगीळ आदी उपस्थित होते.
एक्सलंट योगामध्ये गुरुपौर्णिमा
हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसच्यावतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. योगगुरु शंकरराव कुलकर्णी यांचा साधकांच्या हस्ते भेटवस्तू, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनंत लाड यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. त्यानंतर बी. के. बिर्जे यांच्या हस्ते कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिवाजी मुचंडी, शिवशंकरी नायक, व्ही. पी. कित्तूर आदींनी विचार व्यक्त केले. प्रवीण पटेल यांनी आभार मानले. कुलकर्णी यांनी गुरुचे महत्त्व सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
श्रीदत्त त्रिपुरी सुंदरी मठात गुरुपौर्णिमा
श्रीदत्त त्रिपुरी सुंदरी मठ, ओमनगर-बेळगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडले. सकाळी श्री स्वामी समर्थ, श्री सिद्ध हस्तकमल पादुका आणि इंद्रनील मनी आणि गणपती मूर्तींची सहस्त्रधारा अभिषेक, त्यानंतर पूजा, आरती करण्यात आली. दुपारी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी गुऊ मंत्राचा व पाद्यपूजेचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त बेळगावसह मुंबई, पुणे सांगली, कोल्हापूर येथून मोठ्या संख्येने भक्त आले होते.