लोककल्प फौंडेशनतर्फे महिलांच्या आरोग्यवर मार्गदर्शन

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व आरोग्य मित्र फौंडेशन यांच्या सहकार्याने जांबोटी येथे ‘महिलांचे आरोग्य, पोषण आणि आरोग्याची काळजी’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. वर्षा साठे यांनी महिलांचे हिमोग्लोबीन, मासिक पाळीच्या समस्या व दातांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. फिजिओथेरपिस्ट डॉ. अश्विनी बेहरे यांनी महिलांना मासिक पाळीच्या वेळी उपयुक्त ठरणारी योगासने प्रात्यक्षिकासह दाखविली व […]

लोककल्प फौंडेशनतर्फे महिलांच्या आरोग्यवर मार्गदर्शन

बेळगाव : लोककल्प फौंडेशन व आरोग्य मित्र फौंडेशन यांच्या सहकार्याने जांबोटी येथे ‘महिलांचे आरोग्य, पोषण आणि आरोग्याची काळजी’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. वर्षा साठे यांनी महिलांचे हिमोग्लोबीन, मासिक पाळीच्या समस्या व दातांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. फिजिओथेरपिस्ट डॉ. अश्विनी बेहरे यांनी महिलांना मासिक पाळीच्या वेळी उपयुक्त ठरणारी योगासने प्रात्यक्षिकासह दाखविली व सोपी दिनचर्या कशी असावी, याची माहिती दिली. सहभागी महिलांना खजूर, बदाम, फळे अशा वस्तू भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी फौंडेशनचे संचालक किरण गावडे, व्यवस्थापक मालिनी बाली, प्रितेश पोतेकर, संतोष कदम उपस्थित होते. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहे. जांबोटी येथील बाबुराव ठाकुर कॉलेजमध्ये हा कार्यक्रम पार पडला.