कन्नड फलक उभारणीसाठी मनपाची कारवाई सुरूच

बेळगाव : महानगरपालिकेने येथील मराठी व्यावसायिकांना कन्नडसक्ती करण्यासाठी नोटिसा देणे, तसेच फलक जप्त करण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. त्यामुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारीही मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या. याचबरोबर काही फलकही जप्त करण्यात आले आहेत. मराठी फलक असलेल्या व्यावसायिकांना ते फलक काढून त्या फलकावरील 60 टक्के जागेमध्ये कन्नडचा उल्लेख करण्याचा […]

कन्नड फलक उभारणीसाठी मनपाची कारवाई सुरूच

बेळगाव : महानगरपालिकेने येथील मराठी व्यावसायिकांना कन्नडसक्ती करण्यासाठी नोटिसा देणे, तसेच फलक जप्त करण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. त्यामुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारीही मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या. याचबरोबर काही फलकही जप्त करण्यात आले आहेत. मराठी फलक असलेल्या व्यावसायिकांना ते फलक काढून त्या फलकावरील 60 टक्के जागेमध्ये कन्नडचा उल्लेख करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून व व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहर व उपनगरांमधील आस्थापनांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कारवाई केली आहे.
काही मराठी फलक जप्त
गेल्या आठ दिवसांमध्ये जवळपास 3 हजार आस्थापनांना नोटिसा दिल्या गेल्या आहेत. सोमवारी काही मराठी फलक जप्त केले आहेत. दोन दिवसांत कन्नडचा उल्लेख करावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पाणीटंचाई, तसेच इतर समस्या दूर करण्याऐवजी कन्नडसाठीच आटापिटा सुरू आहे. यामुळे बेळगावच्या जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.