साईराज वॉरियर्स, पोतदार रॉयल्स, साई स्पोर्ट्स क्लब संघांचे शानदार विजय

साईराज वॉरियर्स, पोतदार रॉयल्स, साई स्पोर्ट्स क्लब संघांचे शानदार विजय

सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या  सामन्यात साईराज वॉरियर्स पोतदार रॉयल्स सी सी आय व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने शानदार विजय संपादन केले. झिशान अली सय्यद, अंगदराज हितलमनी, रामलिंग पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. युनियन  जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात साईराज वॉरिअर संघाने रोहन ट्रेडर्स बीएससी संघाचा 48 धावांनी पराभव केला. साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 193 धावा केल्या. त्यात कर्णधार झिशानअली सय्यदने चौफेर टोलेबाजी करताना फक्त 39 चेंडूत 11 षटकार व 2 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. रोशन एम.ज.ने 38 तर संतोष सुळगे-पाटीलने 22 धावांचे योगदान दिले. रोहन ट्रेडर्स तर्फे कृष्णा बागडीने 2 गडी बाद केले. प्रतुत्तरादाखल खेळताना रोहन ट्रेडर्स बीएससी संघाचा डाव 18.4 षटकात 145 धावात आटोपला. त्यात राहुल नाईकने 4 षटकार 3 चौकारांसह 47, सुदीप सातेराने 34 धावांचे योगदान दिले. साईराज वॉरिअर्स तर्फे संतोष सुळगे-पाटीलने 5, ओमकार वेर्णेकरने 3 तर नंदकुमार मलतवाडकरने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआय संघाने केआर शेट्टी किंग्स संघाचा 69 धावांनी पराभव केला.  पोतदार रॉयल्स सीसीआयने प्रथम फलंदाजी करताना संघाने 20 षटकात 6 गडी बाद 167 धावा केल्या. त्यात अंगदराज हितलमनीने सर्वाधिक 54, अमित यादवने 40 तर अभिषेक देसाईने 21 धावांचे योगदान दिले.
केआर शेट्टी संघातर्फे राजेंद्र दंगणावर व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केआर शेट्टी किंग्ज संघाचा डाव 15.2 षटकात 98 धावात आटोपला. त्यात राजेंद्र दंगणावरने 21 धावांचे योगदान दिले. पोतदार रॉयल्स तर्फे आकाश असलकरने 4, तर स्वयम आपण्णवर व आदर्श हिरेमठ यांनी प्रत्येक 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानाचा 5 गड्यांनी पराभव केला. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना  संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 148 धावा केल्या. दर्शन पाटीलने 4 चौकार व 4 षटकारांसह 56, शिवप्रकाश हिरेमठने 37, विनोद देवाडीगा 27, केतज कोल्हापुरेने 18 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लबतर्फे अमर घाळेने 3 तर वैभव कुरीबागी व रामलिंग पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रतुत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 18 षटकात 5 गडी बाद 153 धावा करीत हा सामना 5 गड्यानी जिंकला. त्यात रामलिंग पाटीलने 41, रोहित देसाईने 4 षटकार एक चौकारांसह 40, वैभव कुरीबागीने 21, मिलिंद चव्हाणने 14 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस संघातर्फे पार्थ पाटीलने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे राकेश कलघटगी, निशील पोतदार व विनायक कडोलकर यांच्या हस्ते सामनावीर रामलिंग पाटील व इम्पॅक्ट खेळाडू दर्शन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे भरत तोपिनकट्टी, अनंत पाटील व दीपक राजूकर यांच्या हस्ते सामनावीर झिशान अली सय्यद व इम्पॅक्ट खेळाडू संतोष सुळगे पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सामनावीर अंगदराज हितलमनी इम्पॅक्ट खेळाडू संयम आपणावर यांना प्रमुख पाहुणे एम आर गणजी, चेतन बैलूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.