म. ए. समिती कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांची सदिच्छा भेट
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी बारामती येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीदरम्यान सीमाप्रश्नासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सहकारमहर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला येण्याचे त्यांनी कबूल केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शरद पवार यांच्याकडे करण्यात आले. तसेच मागील काही दिवसात घडलेल्या घडामोडींबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, सुनील आनंदाचे, विनोद आंबेवाडीकर, पांडू पट्टण्णा, मारुती मरगाणाचे, महादेव मंगनाकर, लक्ष्मण मोहिते, विनायक मरगाळे यासह इतर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी म. ए. समिती कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांची सदिच्छा भेट
म. ए. समिती कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांची सदिच्छा भेट
बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी बारामती येथे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीदरम्यान सीमाप्रश्नासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सहकारमहर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला येण्याचे त्यांनी कबूल केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा लवकरात लवकर सुनावणीस यावा, यासाठी […]