अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेवण्याची माजी महापौरांची सूचना

अंगणवाडी परिसर स्वच्छ ठेवण्याची माजी महापौरांची सूचना

बेळगाव : अनगोळ येथील अंगणवाडींना माजी महापौर शोभा सोमनाचे यांनी भेट देऊन पाहणी केली. अंगणवाडी परिसरातील पाण्याचा निचरा करणे तसेच या परिसरातील कचरा काढण्याची सूचना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिली. तातडीने त्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रभाग क्र. 57 मधील अंगणवाडी परिसरामध्ये माजी महापौरांनी भेट देऊन तातडीने मनपा कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे. सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यामुळे अंगणवाडीतील पाणीपुरवठाही रोजच्या रोज करावा, अशी सूचनाही त्यांनी पाणीपुरवठा विभागाला केली आहे. यावेळी परिसरातील महिला उपस्थित होत्या.