वर्ल्डकपमध्ये महिला तिरंदाजांची गोल्डन हॅट्रिक

वृत्तसंस्था/ अंताल्या, तुर्कस्थान भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेण्णम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या कंपाऊंड महिला संघाने या मोसमात आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आणि शनिवारी इस्टोनियावर विजय मिळवून तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली. अव्वल मानांकित भारतीय त्रिकुटाने येथे झालेल्या एकतर्फी फायनलमध्ये इस्टोनियाच्या लिसेल जाटमा, मिरी मेरीटा आणि मारिस टेट्समन यांचा 232-229 असा पराभव […]

वर्ल्डकपमध्ये महिला तिरंदाजांची गोल्डन हॅट्रिक

वृत्तसंस्था/ अंताल्या, तुर्कस्थान
भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेण्णम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या कंपाऊंड महिला संघाने या मोसमात आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आणि शनिवारी इस्टोनियावर विजय मिळवून तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली. अव्वल मानांकित भारतीय त्रिकुटाने येथे झालेल्या एकतर्फी फायनलमध्ये इस्टोनियाच्या लिसेल जाटमा, मिरी मेरीटा आणि मारिस टेट्समन यांचा 232-229 असा पराभव केला. विशेष म्हणजे, भारताच्या कंपाऊड  संघाने एप्रिलमध्ये चीनमधील शांघाय व मे मध्ये दक्षिण कोरियातील येचेऑन येथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर शनिवारी तुर्कस्थानमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या लेगमध्ये ज्योती, आदिती व परनीत जोडीने आपला दबदबा कायम ठेवला.