एशियन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागेंद्र मडिवाळला सुवर्णपदक
बेळगाव : दिल्ली येथे युनायटेड इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशन आयोजित मि. एशिया शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या वज्रजीमचे नागेंद्र मडिवाळने 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. मि. एशिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नागेंद्र हा बेळगावचा पहिला बॉडीबिल्डर आहे. दिल्ली येथील तालकटोरा इंदोर स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या मि. एशियन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत एशिया खंडातून जवळपास 400 हून अधिक बॉडी बिल्डर्सनी भाग घेतला होता. 75 किलो वजनी गटात बेळगावच्या नागेंद्र मडिवाळने सुवर्णपदक पटकावित यश संपादन केले. मि. एशिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासाठी झालेल्या लढतीत नागेंद्रने चुरशीची लढत दिली. यापूर्वी बेंगलोर येथे झालेल्या बेंगलोर प्रो राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नागेंद्र मडिवाळने बेंगलोर प्रो हा मानाचा किताब पटकावीत एशियन स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. ज्या बॉडी बिल्डरला प्रो कार्ड मिळते तोच बॉडी बिल्डर एशियन किंवा विश्व स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. नागेंद्र मडिवाळला कर्नाटकाचे प्रशिक्षक सिद्धू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. हिंडलगा येथील वज्र जिममध्ये व्यायामपटूंना नागेंद्र मार्गदर्शन करीत आहे.
Home महत्वाची बातमी एशियन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागेंद्र मडिवाळला सुवर्णपदक
एशियन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत नागेंद्र मडिवाळला सुवर्णपदक
बेळगाव : दिल्ली येथे युनायटेड इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशन आयोजित मि. एशिया शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या वज्रजीमचे नागेंद्र मडिवाळने 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. मि. एशिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नागेंद्र हा बेळगावचा पहिला बॉडीबिल्डर आहे. दिल्ली येथील तालकटोरा इंदोर स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या मि. एशियन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत एशिया […]