अवघा गोवा आज होणार शिवमय
सरकारी, खासगी पातळीवर भरगच्च्च कार्यक्रम : डिचोलीसह पाच शहरांत होणार सरकारी सोहळा
पणजी : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सरकारी तसेच खासगी पातळीवर राज्यभरात अनेक ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराजांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण, मिरवणुका, व्याख्याने, स्पर्धा, देखावे, घोडेमोडणी, नाटके असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच पर्यटन खात्यातर्फे डिचोली येथे राज्यपातळीवर शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला असून अन्य पाच शहरांमध्येही सोहळे होणार आहेत. डिचोली येथून आज शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येईल. राज्याभिषेक सोहळा दर्शविणारी पात्रे दाखवली जाणार आहेत. ही मिरवणूक डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानापासून निघेल. ज्यामध्ये दिंडी, लेझीम, ढोल ताशे तसेच अन्य गटांचे सादरीकरण होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेटये उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी सात वाजता 7 वाजता डिचोलीतील छत्रपती शिवाजी मैदानावर ‘मराठी पाऊल पढती पुढे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
पाच शहरांमध्येही आयोजन
सांखळी, मडगाव, वास्को, म्हापसा, फोंडा या नगरपालिका क्षेत्रात शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पर्यटन खात्यातर्फे यावर्षी प्रथमच प्रत्येकी 5 लाख ऊपयांचा निधी देण्यात आला असून त्यादृष्टीने शिवाजी महाराजांच्या वारशाचे प्रतीक असणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सादरीकरणे होणार आहेत.
शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाण्यांचे प्रदर्शन सुरु
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील शस्त्रास्त्रs आणि नाण्यांचे प्रदर्शन काल रविववार 18 रोजी पर्वरीत डीआयईटी सभागृहात भरविण्यात आले आहे. दि. 20 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. शाळांना एका अनोख्या शैक्षणिक अनुभवासाठी प्रदर्शनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
पणजीत आज शिवजयंती मिरवणूक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजधानी पणजीत आज भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. पणजी शिवजयंती उत्सव समिती, मनपा आणि पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने शिवाजी महाराजांचे चित्ररथ, घोडेमोडणी, महिला पथकांचा ढोल ताशा, लेझीम पथक, यांचा समावेश असेल. त्याशिवाय पणजी परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिवप्रेमी नागरिक मिरवणुकी सहभागी होणार आहेत. सायंकाळी 4 वाजता महालक्ष्मी मंदिराकडून मिरवणूक प्रारंभ होईल. त्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजामातेच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी होतील. या सहभागींना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, आणि खुला, अशा गटात पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल. ही मिरवणूक शहरात फिरून आझाद मैदानापर्यंत येईल. तेथे शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा होईल. त्याशिवाय शालेय विद्यार्थी व नागरिक यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा गायन स्पर्धा होईल. शेवटी छत्रपती शिवरायांवर आधारित संगीताचा कार्यक्रम होईल, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी अवघा गोवा आज होणार शिवमय
अवघा गोवा आज होणार शिवमय
सरकारी, खासगी पातळीवर भरगच्च्च कार्यक्रम : डिचोलीसह पाच शहरांत होणार सरकारी सोहळा पणजी : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सरकारी तसेच खासगी पातळीवर राज्यभरात अनेक ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराजांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण, मिरवणुका, व्याख्याने, स्पर्धा, देखावे, घोडेमोडणी, नाटके असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित […]