गोवा बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल

पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या दहावी शालान्त परीक्षेचा निकाल आज बुधवार दि. 15 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पर्वरी येथील  शिक्षण मंडळाच्या परिषदगृहात घोषित केला जाईल. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  शालान्त परीक्षा राज्यभरातील 31 केंद्रांवर घेतली होती.  या वर्षी एकूण 20,184 विद्यार्थी परीक्षेला […]

गोवा बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल

पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) एप्रिल 2024 मध्ये घेतलेल्या दहावी शालान्त परीक्षेचा निकाल आज बुधवार दि. 15 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता पर्वरी येथील  शिक्षण मंडळाच्या परिषदगृहात घोषित केला जाईल. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे  शालान्त परीक्षा राज्यभरातील 31 केंद्रांवर घेतली होती.  या वर्षी एकूण 20,184 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात मुले 9743,  मुली 9814, रिपीटर 242, खाजगी आयटीआय  385 विद्यार्थी बसले होते. एकत्रित निकालपत्रिका दि. 17 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून शाळेच्या https://service1. gbshse.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. शालांत परीक्षेचा निकाल http://results.gbshsegoa.net /#/ आणि भारत सरकारच्या डिजीलॉकर पोर्टलवर उपलब्ध असेल. निकालाची पुस्तिका मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल. शाळेला निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ( www.gbshse.in ) वरून डाऊनलोड करता येईल.  मार्कशीट वितरणाच्या तारखेची सविस्तर माहिती गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर सूचित केली जाईल.