व्हीटीयू बॅडमिंटन स्पर्धेत जीआयटीला विजेतेपद

बेळगाव : धारवाड येथील एसडीएमसीईटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित बेळगाव विभागीय व्हिटीयू चषक बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे तांत्रिक महाविद्यालय (जीआयटी) संघाने एसजीबिआयटी बेळगाव संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले आहे. धारवाड येथील एसडीएम महाविद्यालयाच्या बॅडमिंटन सभागृहात व्हीटीयू विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत जवळपास 30 हून अधिक महाविद्यालय संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत उपांत्यफेरीच्या सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने […]

व्हीटीयू बॅडमिंटन स्पर्धेत जीआयटीला विजेतेपद

बेळगाव : धारवाड येथील एसडीएमसीईटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित बेळगाव विभागीय व्हिटीयू चषक बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे तांत्रिक महाविद्यालय (जीआयटी) संघाने एसजीबिआयटी बेळगाव संघाचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले आहे. धारवाड येथील एसडीएम महाविद्यालयाच्या बॅडमिंटन सभागृहात व्हीटीयू विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत जवळपास 30 हून अधिक महाविद्यालय संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत उपांत्यफेरीच्या सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने जेसीईआर बेळगाव संघाचा 21-16, 21-18, 21-16 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जीआयटी बेळगावने एसजीबीआयटी संघाचा 21-19, 21-15, 21-13 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. या बॅडमिंटन संघात ओंम ईलीगार, अमोग कल्लीमठ, समृध्द व प्रथमेश या खेळाडूंचा सहभाग होता. ओंम यल्लीगार व अमोघ कल्लीमठ यांना बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन तर बॅडमिंटन प्रशिक्षक भुषण अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.