धामणेत मराठी शाळेला रोटरी क्लबकडून साहित्य भेट
ग्रीन बोर्ड, संगणक, 40 बेंचसह विद्यार्थ्यांसाठी दिले शौचालय बांधून : पालकवर्गातून समाधान
वार्ताहर /धामणे
धामणे येथील प्राथमिक मराठी शाळेला रोटरी क्लब बेळगाव इलाईट यांच्यावतीने 5 ग्रीन बोर्ड, 3 संगणक, 40 बेंच व विद्यार्थ्यांसाठी शौचालय नव्याने बांधून देण्यात आले. असे एकूण साडे तीन ते चार लाख किमतीचे साहित्य देण्यात आले. त्याचे उद्घाटन दि. 30 रोजी शाळेच्या सभागृहात समारंभपूर्वक पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष पंडीत पाटील होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीच्या फोटोचे पूजन रोटरी क्लबचे अध्यक्ष जय कुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार शाळा कमिटीचे अध्यक्ष गणपती लोकळुचे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रोटरी क्लबचे जिल्हा गव्हर्नर नासीर यांच्या हस्ते देण्यात आलेल्या संगणकांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी असिस्टंट गव्हर्नर शितल व शिक्षक उपस्थित होते.
मागील महिन्यात रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी धामणे येथील प्राथमिक मराठी शाळेला भेट देवून शाळेचे शिक्षक व एसडीएमसी कमिटीची भेट घेवून शाळेतील सदस्यांबद्दल माहिती घेतला. आणि त्याप्रमाणे रोटरी क्लबच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्या वस्तुंची अडचण भासत होती त्या वस्तूंची पुर्तता शनिवार दि. 29 रोजी शाळेच्या कमिटी व शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी शेवटी आभार मानले. या कार्यक्रमाला शाळा कमिटीचे सर्व सदस्य, शिक्षकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लबच्यावतीने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेला मदत केल्याबद्दल सर्व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी धामणेत मराठी शाळेला रोटरी क्लबकडून साहित्य भेट
धामणेत मराठी शाळेला रोटरी क्लबकडून साहित्य भेट
ग्रीन बोर्ड, संगणक, 40 बेंचसह विद्यार्थ्यांसाठी दिले शौचालय बांधून : पालकवर्गातून समाधान वार्ताहर /धामणे धामणे येथील प्राथमिक मराठी शाळेला रोटरी क्लब बेळगाव इलाईट यांच्यावतीने 5 ग्रीन बोर्ड, 3 संगणक, 40 बेंच व विद्यार्थ्यांसाठी शौचालय नव्याने बांधून देण्यात आले. असे एकूण साडे तीन ते चार लाख किमतीचे साहित्य देण्यात आले. त्याचे उद्घाटन दि. 30 रोजी शाळेच्या सभागृहात समारंभपूर्वक पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत […]