कर्नाटकातील रेल्वेसाठी साडेसात हजार कोटींचा निधी
विकासकामांना गती देण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांची ग्वाही : पाच महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांचे होणार नूतनीकरण
बेळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकातील रेल्वेसाठी 7 हजार 559 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली. सध्या 31 प्रकल्पांतर्गत 3,840 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, 47016 कोटी रुपये खर्च करून तयार केला जात आहे. मागील दहा वर्षांत 638 रोड ओव्हरब्रिज तसेच रोड अंडरब्रिज तयार करण्यात आले आहेत. अमृत भारत स्टेशन स्कीम अंतर्गत राज्यातील 59 रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. रेल्वेप्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. नैर्त्रुत्य रेल्वेतील पाच महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सध्या 88 टक्के रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. मार्च 2025 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे बेळगावसह राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार आहे.
Home महत्वाची बातमी कर्नाटकातील रेल्वेसाठी साडेसात हजार कोटींचा निधी
कर्नाटकातील रेल्वेसाठी साडेसात हजार कोटींचा निधी
विकासकामांना गती देण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांची ग्वाही : पाच महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांचे होणार नूतनीकरण बेळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये कर्नाटकातील रेल्वेसाठी 7 हजार 559 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली. सध्या 31 प्रकल्पांतर्गत 3,840 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, 47016 कोटी […]