रामदुर्ग वगळता सर्व तालुक्यातील शाळांना आज सुटी
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शनिवार दि. 27 जुलै रोजी रामदुर्ग तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांतील अंगणवाडी, प्राथमिक-माध्यमिक शाळा व पदवीपूर्व कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा निर्णय घेतला असून शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. रामदुर्ग तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यात संततधार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रामदुर्ग वगळता इतर सर्व तालुक्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या सोमवार दि. 22 जुलैपासून बेळगाव, खानापूर या दोन तालुक्यांना सुटी जाहीर केली होती. त्यानंतर वाढता पाऊस लक्षात घेऊन गोकाक, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर आदी तालुक्यांनाही सुटी दिली होती. आता शनिवारी एक तालुका वगळता संपूर्ण जिल्ह्यात सुटी असणार आहे.
Home महत्वाची बातमी रामदुर्ग वगळता सर्व तालुक्यातील शाळांना आज सुटी
रामदुर्ग वगळता सर्व तालुक्यातील शाळांना आज सुटी
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शनिवार दि. 27 जुलै रोजी रामदुर्ग तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांतील अंगणवाडी, प्राथमिक-माध्यमिक शाळा व पदवीपूर्व कॉलेजना सुटी जाहीर करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हा निर्णय घेतला असून शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. रामदुर्ग […]