… तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा

… तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा

बिगर सरकारी संस्थांच्या प्रतिनिधींचा इशारा
म्हापसा : राज्यातील विविध भागातील सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी त्यात शंकर पोळजी, संजय बर्डे, तारा केरकर, रामा काणकोणकर, प्रतिमा कुतिन्हो एकत्रित येऊन त्यांनी प्रदीप आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घराची पाहणी करीत आगरवाडेकर कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी सरकारकडे मागणी केली. या वृत्तीचा निषेध करीत सरकार दिल्लीवाल्यांना विकले गेले आहे, असा आरोप केला. तसेच आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पुन्हा बांधून न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी बोलताना प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, क्रिस पिंटो भाटकाराला प्रदीप आगरवाडेकरांनी जमिनीचे पैसे वेळोवेळी दिले, पण आज येथे पूजा शर्मा पोचली कशी? तिने घर पाडले कसे? याचा शोध मुख्यमंत्र्यांनी लावावा. पोलीस निरीक्षक प्रशल देसाई कुणाच्या आदेशावर नाचतात हे स्पष्ट करावे. रामा काणकोणकर म्हणाले,आगरवाडेकरांचे घर पुन्हा जशास तसे बांधून दिले नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येऊन ठाण मांडणार आहोत. यावेळी तारा केरकर, संजय बर्डे, शंकर पोळजी यांनी पोलीस तसेच सरकारवर टीका केली.