स्थायी समितींसाठी चार मतपत्रिका तयार

बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची निवडणूक 2 जुलै रोजी होत आहे. याची तयारी कौन्सिल विभागाने सुरू केली आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे. त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेमध्ये भेट देऊन पाहणी करून तेथील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मत पत्रिकेद्वारे ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार मतपत्रिका तयार केल्या आहेत. चार स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी चार वेगवेगळ्या […]

स्थायी समितींसाठी चार मतपत्रिका तयार

बेळगाव : महानगरपालिकेतील स्थायी समितींची निवडणूक 2 जुलै रोजी होत आहे. याची तयारी कौन्सिल विभागाने सुरू केली आहे. प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानुसार हे कामकाज सुरू आहे. त्यांनी गुरुवारी महानगरपालिकेमध्ये भेट देऊन पाहणी करून तेथील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
मत पत्रिकेद्वारे ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार मतपत्रिका तयार केल्या आहेत. चार स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असली तरी कौन्सिल विभागाला निवडणुकीची तयारी केलीच पाहिजे, असे कौन्सिल सेक्रेटरी जे. महेश यांनी यावेळी सांगितले. अचानक कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे.
महानगरपालिकेतील शिक्षण व आरोग्य, अर्थ व कर, सार्वजनिक बांधकाम आणि लेखा स्थायी समितीची ही निवडणूक होत आहे. प्रत्येक स्थायी समितीमध्ये 7 नगरसेवकांची निवड केली जाते. त्या नगरसेवकांतून एक चेअरमन निवडला जातो. त्यानुसार या निवडणुकीचे नियोजन करण्यात येत आहे. गेल्या 8 दिवसांपासून महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने ही तयारी सुरू केली आहे.