युद्धात दोन्ही पाय गमावलेला युक्रेनचा माजी सैनिक बनलाय तरुणींच्या गळ्यातील ताईत, हे आहे कारण

रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही पाय गमावलेला एक माजी सैनिक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. जेव्हा या तरुणाचा जोडीदार होण्याची संधी आपल्याला मिळू शकते हे कळाल्यावर अनेक तरुणी आपले नशीब आजमावून पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे.

युद्धात दोन्ही पाय गमावलेला युक्रेनचा माजी सैनिक बनलाय तरुणींच्या गळ्यातील ताईत, हे आहे कारण

रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही पाय गमावलेला एक माजी सैनिक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. जेव्हा या तरुणाचा जोडीदार होण्याची संधी आपल्याला मिळू शकते हे कळाल्यावर अनेक तरुणी आपले नशीब आजमावून पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे.

हा तरुण कोण आहे, त्याच्या सोबत नेमकं काय घडलं आणि तो त्याच्या देशात इतका का चर्चेत आहे हे आपण समजून घेऊ.

ऑगस्ट 2022 मध्ये युक्रेनचं सैन्य आपला ईशान्य खारकीव भाग वाचवण्यासाठी रशियन सैनिकांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत होतं. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यातील एक युनिट रशियन हल्ल्यांत जखमी झाले. यामध्ये त्याच युनिटमधील एक सैनिक ऑलेकसांडर बुडको हे त्यांच्या जवळच यांच्या झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते.

असह्य वेदनेने विव्हळत असलेल्या ऑलेकसांडर यांना रुग्णालयात नेण्यात आलं, उपचारादरम्यान त्यांचे दोन्ही निकामी झालेले पाय काढून टाकण्यात आले.

या घटनेला 2 वर्षं उलटली असून आता युक्रेनी सेनेचा हा 26 वर्षीय जवान एका रिॲलिटी शोचा स्टार बनलाय. त्यांच्या चाहत्यांमध्ये तरुणींशी संख्या लक्षणीय आहे, असं म्हटलं जातं.

 

‘द बॅचलर’ या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. या शो’मध्ये असलेला नायक हा अनेक तरुणींमधून आपला जोडीदार निवडतो. अशी या शो’ची संकल्पना आहे.

 

ही एका अमेरिकन टीव्ही शोची मूळ संकल्पना आहे. विविध देशांत या शो’च्या स्थानिक आवृत्ती प्रक्षेपित होतात.

 

या शो’च्या युक्रेनियन आवृत्तीमध्ये ऑलेकसांडर यांनी सहभाग घेतला आहे. ते या शो’चे नायक असतील. वर्षाच्या शेवटीला हा शो प्रेक्षकांसमोर येणार आहे. तत्पूर्वी या शो’च्या प्रमोशनमध्ये ते झळकताना दिसत आहेत.

या शो’चे जे प्रोमोज झळकत आहेत त्यात त्यांच्या विविध छटा दिसत आहेत. कधी ते फुलांकडे टक लावून पाहताना दिसतात तर कधी ते जिममध्ये व्यायाम करताना दिसतात. तर कधी युक्रेनियन लोकांशी संवाद साधताना ते या प्रोमोजमध्ये दिसत आहेत.

 

युद्धातील ‘त्या’ घटनेनंतरचं जीवन

ऑलेकसांडर सांगतात, गेल्या जानेवारीत त्यांचं त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं. त्यानंतर त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवीन जोडीदार मिळेल अशी अपेक्षा आहे.

मात्र, लाखोंच्या गर्दीत एक चांगला जोडीदार शोधणं खूप कठीण काम असल्याचंही ते म्हणतात.

या रिॲलिटी शोच्या माध्यमातून विकलांग लोकांच्या प्रश्नांबाबत जागरुकता निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.

याबाबत बोलताना ऑलेकसांडर म्हणतात, “हजारो-लाखो लोक हा कार्यक्रम पाहतात, त्यामुळे विकलांगाप्रती लोकांचा दृष्टीकोन बदलण्याचा, जागरूकता वाढवण्यासाठी हा कार्यक्रम एक उत्तम व्यासपीठ आहे.”

 

ऑलेकसांडर सांगतात की, ‘त्यांना जगाला पटवून द्यायचं आहे की युद्धातले जखमी सैनिक किंवा विकलांग लोक हे इतरत्र कुठून आलेले नाहीत तर याच समाजाचा भाग आहेत. ते देखील चांगले जीवन जगत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रगल्भ हवा.’

 

ऑलेकसांडर सांगतात की, ‘त्यांचे सध्याचे जीवन हे युद्धात त्यांच्याबरोबर घटलेल्या परिस्थितीपेक्षा चांगलं आहे.’

ऑलेकसांडर नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच एक गाणं शूट केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

युद्धातील ती घटना ज्यामुळे आयुष्य बदललं

युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याआधी ते ग्राफिक डिजायनरचा कोर्स करत होते आणि कीव्हमधील एका रेस्टॉरंटमध्येही काम करायचे.

ऑलेकसांडर सांगतात की, ‘त्यांना प्रवास करणं, नवनवीन ठिकाणांचा शोध घेण्यासह एक व्यावसायिक म्हणून काम करण्यासोबतचं आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची त्यांची स्वप्नं होती.’

मात्र, दोन वर्षांपूर्वी रशियन हल्ल्यादरम्यान हजारो युक्रेनी पुरुषांप्रमाणेच ते सैन्यात गेले आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

ऑगस्ट 2022 मध्ये ऑलेकसांडर इजियम या शहरात तैनात होते. युक्रेनच्या शहरावर त्यावेळी रशियाने ताबा मिळवला होता. रशियन सैन्याला पूर्व भागात रसद पुरवण्यासाठी एक केंद्र म्हणून हे रशिया या शहराचा वापर करत होतं.

या शहरात झालेल्या हल्ल्यातच ऑलेकसांडर यांनी आपले पाय गमावले.

ऑलेकसांडर जखमी झाल्याच्या एका महिन्यानंतर युक्रेनने रशियाच्या ताब्यात असलेल्या या शहराची सुटका केली होती.

त्या हल्ल्याची आठवण सांगताना ऑलेकसांडर म्हणाले, “त्या क्षणी मला वाटलं की जणू मी जमीनदोस्त झालो आहे. माझ्या पायांना तीव्र वेदना होत होत्या. त्या क्षणी मला जाणवलं की आता माझे पाय कापावे लागतील. मी वेदनेने विव्हळत होतो जेणेकरून माझा आवाज लोकांपर्यंत जाईल आणि कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल.”

ऑलेकसांडर पुढे म्हणाले, त्यांना माहीत होतं की आपल्या इतर सहकाऱ्यांनी आपल्याला सुरक्षितपणे बाहेर काढून प्रथमोपचार दिले. मात्र, त्यांच्या पायांवरील जखमा या अतिशय गंभीर होत्या.

 

आपल्या पायांबाबत ऑलेकसांडर सांगतात, “जखमी झाल्याच्या दोन-तीन सेकंदातच मला जाणवू लागले की मी माझे पाय कायमचे गमावले आहेत.”

 

ऑलेकसांडर तर वाचले मात्र इजियम शहाराचा बहुतांश भाग ढासळला होता. अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून शहरातील 400 पेक्षा अधिक लोकांचे मृतदेह सापडले होते.

 

कार्यक्रमाचं प्रक्षेपण केव्हा?

गंभीर जखमी झालेले ऑलेकसांडर कृत्रिम पायांच्या मदतीने चालण्यास सक्षम झाले.

ऑलेकसांडर म्हणतात, जेव्हा माझ्याकडे कृत्रिम पाय नव्हते, तेव्हा मी व्हीलचेअरच्या मदतीने फिरायचो. तेव्हा मला जाणवलं की शहरात व्हीलचेअरमुळे मला फिरताना त्रास होत असे.

“अशा स्थितीत असताना तुम्ही एका जुन्या ऐतिहासिक स्थळी एकट्याने भेट देऊ शकत नाही. तुम्ही स्वत: रस्ता पार करू शकत नाही आणि पायऱ्या असल्या कारणाने काही वास्तूंच्या आतही जाणं शक्य होत नाही,” ऑलेकसांडर सांगतात.

युद्धानंतर ऑलेकसांडरसारखे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. युद्धातील जखमीची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली तरी हजारो लोकांना विकलांगता आल्याचा एक अंदाज सांगण्यात येतोय.

 

यामुळेच या रिॲलिटी शोची सुरुवात करण्यात आली असून याला ‘लेग्स ऑफ’ असंही म्हटलं जात आहे. या शोचे निवेदक ऑलेकसांडर आहेत. यात ऑलेकसांडर युक्रेनियन शहरांना भेटी देऊन विकलांग लोकांना येणाऱ्या अडचणींबाबत जागरुकता निर्माण करतात.

 

या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासह त्यांनी एक पुस्तकदेखील लिहीलंय.

या घटनेतून सावरल्यानंतर त्यांनी ‘इनविक्टस गेम्स’मध्ये पदकदेखील जिंकले असून अमेरिकेतील एका बॅले समूहासह त्यांनी कार्यक्रमही केले आहेत.

सध्या ते युक्रेनमध्ये बरेच प्रसिद्ध झाले आहेत. ‘द बॅचलर’ शोच्या निर्मात्यांनी या कार्यक्रमाच्या त्यांच्या नावाची घोषणा करताच या कार्यक्रमात येणाऱ्या अर्जांमुळे पोर्टल क्रॅश झालं होतं.

 

‘द बॅचलर’चे निर्माते ऑलेक्जेंडरला एक अनुभवी आणि आशेच्या प्रतीकाच्या रूपाने कास्ट करताहेत.

कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणाऱ्या एसटीबी नेटवर्कच्या नतालिया फ्रँचुक सांगतात की हा ‘कार्यक्रम यावर्षीच्या शेवटी प्रक्षेपित केला जाईल. ऑलेकसांडर यांचे पाय नसतानाही ते बाईक, कार चालवतात. डोंगरदऱ्या सर करतात. त्यांच्या स्वप्नांना अखेर पंख फुटले आहेत.’

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

Published By- Priya Dixit 

 

Go to Source