सिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, 27 ऑगस्ट 2024 रोजी, सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबईतील (navi mumbai)विविध गृहसंकुलांमध्ये एकूण 902 घरांसाठी गृहनिर्माण योजना (housing scheme) सुरू केली आहे. एकूण 902 घरांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित गृहसंकुलांमधील 213 घरे आणि सिडकोच्या (CIDCO) व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि खारघर येथील वास्तुविहार-सेलिब्रेशन हाउसिंग कॉम्प्लेक्समधील 689 घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको सातत्याने गृहनिर्माण योजना सुरू करत आहे. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीला 902 घरांच्या विक्रीची गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, 213 उपलब्ध घरांपैकी 38 घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कळंबोली (kalamboli), खारघर आणि घणसोली नोड्समध्ये उपलब्ध केली आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील खरेदीदारांसाठी घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि 175 घरे सर्वसाधारण श्रेणी अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.तसेच, खारघर येथील सिडकोच्या व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविह-सेलिब्रेशन गृहसंकुलातील 689 घरांपैकी 42 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, 359 घरे अल्प उत्पन्न गटासाठी, 128 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटासाठी 160 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 27 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि योजनेतील घरांची ऑनलाइन यादी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दाखवण्यात येईल. https://lottery.cidcoindia.com/ ही वेबसाइट ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.हेही वाचापश्चिम रेल्वेकडून नवीन वेळापत्रक जाहीरठाणे : बुधवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा खंडित
Home महत्वाची बातमी सिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना
सिडकोतर्फे 902 घरांच्या विक्रीसाठी गृहनिर्माण योजना
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, 27 ऑगस्ट 2024 रोजी, सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबईतील (navi mumbai)विविध गृहसंकुलांमध्ये एकूण 902 घरांसाठी गृहनिर्माण योजना (housing scheme) सुरू केली आहे.
एकूण 902 घरांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित गृहसंकुलांमधील 213 घरे आणि सिडकोच्या (CIDCO) व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि खारघर येथील वास्तुविहार-सेलिब्रेशन हाउसिंग कॉम्प्लेक्समधील 689 घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.
विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको सातत्याने गृहनिर्माण योजना सुरू करत आहे. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीला 902 घरांच्या विक्रीची गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत, 213 उपलब्ध घरांपैकी 38 घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कळंबोली (kalamboli), खारघर आणि घणसोली नोड्समध्ये उपलब्ध केली आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील खरेदीदारांसाठी घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि 175 घरे सर्वसाधारण श्रेणी अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
तसेच, खारघर येथील सिडकोच्या व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविह-सेलिब्रेशन गृहसंकुलातील 689 घरांपैकी 42 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत, 359 घरे अल्प उत्पन्न गटासाठी, 128 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटासाठी 160 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी 27 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल आणि योजनेतील घरांची ऑनलाइन यादी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दाखवण्यात येईल. https://lottery.cidcoindia.com/ ही वेबसाइट ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.हेही वाचा
पश्चिम रेल्वेकडून नवीन वेळापत्रक जाहीर
ठाणे : बुधवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा खंडित