दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी मुक्त संचार गोठा गरजेचा; कृषीतज्ञांचे मत
जालंदर पाटील / चुये प्रतिनिधी
दुग्ध व्यवसाय हा ग्रामीन भागाचा आर्थिक आधार आहे . हा व्यवसाय किफायतशिर दृष्टीकोनातून करण्यासाठी शेतकऱ्यांची हिशेब पद्धत ठेवली पाहिजे . जनावारांचे आहार व संगोपन याला महत्व देऊन उत्पादनखर्च आणि अनावश्यक श्रम कमी करण्यासाठी मुक्त संचार गोठा पद्धत स्विकारणे गरजेचे आहे असे मत कृषिविज्ञान केंद तळसंदेचे प्रा . सुधिर सुर्यगंध यांनी व्यक्त केले.
चुये ताः करवीर येथे डॉ . डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने कृषी कन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी आयोजित व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक सूर्यगंध बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदारलिंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन दिनकर शिवाजी पाटील होते .
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बोलताना प्रा. सुर्यगंध म्हणाले, दुग्ध व्यवसाय मध्ये उत्पादन वाढीसाठी, गाई म्हशींची उत्तम पैदास करण्यासाठी आहार नियोजन महत्त्वाचे आहे . गाय किंवा म्हैस खरेदी करताना स्वतः उत्पादकांनी दूध उत्पादन ,उत्तम जनावरांचे गुणधर्म याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे .यावरतीच दूध उत्पादन आणि पैदास अवलंबून असते .पशुशास्त्राप्रमाणे दुखत्या जनावरांना ओला चारा आणि सुका चारा व आवश्यक अन्नघटक नियमित दिले पाहिजेत .गोठा हवेशीर व प्रत्येक जनावरांना आवश्यक जागा असावी .निरोगी गाई म्हशी साठी मुक्त गोठा पद्धत प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वीकारली पाहिजे त्यामुळे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळतात तसेच दूध उत्पादन वाढल्यामुळे आणि उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे अधिक नफा होऊन दुग्ध व्यवसाय सक्षमपणे वाढू शकतो . युवकांनी हा व्यवसाय वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानातून व्यवसाय स्वीकारला पाहिजे . जनावरांची संख्या वाढवण्यापेक्षा गाई म्हशींचे दूध उत्पादन कसे वाढेल त्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार दूध उत्पादकाने करणे आवश्यक आहे .
यावेळी दुग्ध व्यवसाय संदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे प्राध्यापक सूर्य गंध यांनी देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले .
कृषी कन्या निर्जला देसाई यांनी प्रास्ताविक केले .
या कार्यक्रमाला केदारलिंग सेवा संस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक पांडुरंग कृष्णाजी पाटील ग्रामसेविका सौ. गीतांजली वाईंगडे कृषी कन्या प्राजक्ता काकडे सई पाटील वैष्णवी बुनगे अंकिता माने श्रृतिका शिवतारे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार कृषिकन्या सई पाटील यांनी मानले .