कणबर्गीच्या शेतकऱ्यांनी बुडा आयुक्तांना धरले वेठीस
आपली जमीन सोडून योजना राबवा
बेळगाव : कणबर्गी येथील स्कीम क्रमांक 61 राबविण्यासाठी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी कणबर्गी येथील शेतकरी व परिसरात बांधलेल्या मालमत्ता धारकांनी शहर विकास प्राधिकरण (बुडा) आयुक्तांना धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे निवेदन आयुक्त शकील अहम्मद यांना शेतकऱ्यांनी दिले. कणबर्गी येथील 106 एकर जमिनीत ही योजना राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे. मात्र यामधील 50 एकर 18 गुंठे जमिनीचा नकाशा रद्द करावा, अशी मागणी केली आहे. सध्या येथे 14 एकरमध्ये घरे आहेत. 25 एकरमधील शेतकरी न्यायालयात गेले आहेत. 12 एकरमधील शेतकऱ्यांनी परवानगी दिली नाही.त्यामुळे ही जमीन या योजनेतून वगळावी, अशी मागणी केली.
आयुक्तांची बोलतीच झाली बंद
बुडा आयुक्त शकील अहम्मद यांनी यावेळी या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही सदर जमीन वगळूनच योजना राबविणार आहे, असे सांगितले. यावर आताच आम्हाला याबाबत लेखी द्यावे, असे म्हणताच आयुक्तांची बोलतीच बंद झाली. काही जणांनी बेकायदेशीररित्या यामधील जमीन खरेदी केली आहे. त्यांना ना हरकत पत्र दिले आहे. याबाबत मला अधिक माहिती नाही. पूर्वीच्या आयुक्तांनी ते पत्र दिले असल्याचे सांगितले.
आयुक्तांची उडवाउडवीची उत्तरे
बुडा आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी प्रकाश नाईक, बबन मालाई, प्रभू चौगुले, भवानी मालाई, महादेव मालाई, उमेश हलगेकर, संजू इनामदारसह शेतकरी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी कणबर्गीच्या शेतकऱ्यांनी बुडा आयुक्तांना धरले वेठीस
कणबर्गीच्या शेतकऱ्यांनी बुडा आयुक्तांना धरले वेठीस
आपली जमीन सोडून योजना राबवा बेळगाव : कणबर्गी येथील स्कीम क्रमांक 61 राबविण्यासाठी कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. सोमवारी कणबर्गी येथील शेतकरी व परिसरात बांधलेल्या मालमत्ता धारकांनी शहर विकास प्राधिकरण (बुडा) आयुक्तांना धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे निवेदन आयुक्त शकील अहम्मद यांना शेतकऱ्यांनी दिले. कणबर्गी येथील 106 एकर जमिनीत ही योजना […]