बनावट बिलाद्वारे जीएसटी भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
132 कोटीच्या जीएसटीत गोलमाल : 23.82 कोटी लाटले : केंद्रीय सेवा कर-उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बेळगाव : सीजीएसटी भरताना चलाखी करत बनावट बिलाद्वारे जीएसटी भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. तब्बल 132 कोटीच्या जीएसटीमध्ये गोलमाल करत 23.82 कोटी लाटणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव येथील केंद्रीय सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाने हे प्रकरण उघडकीस आणले असून याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव नकीब नजीब मुल्ला (वय 25 रा. पाचवा क्रॉस, आझमनगर) असे आहे.
नकीब हा आयकर सल्लागार तसेच फेडरल लॉजिस्टिक अॅण्ड कंपनीचा संचालक आहे. तो अनेक संस्थांचे जीएसटी व आयटी रिर्टन्स भरण्याचे काम करत होता. जीएसटी भरल्यानंतर संबंधित संस्थांना मूळ पावत्या देताना फेरफार करत होता. बनावट बिले तयार करून काही कंपन्यांनाही फसवल्याचे उघडकीस आले आहे. नकीब हा आयटी रिटर्न आणि जीएसटीसंदर्भातील समस्या कुशलतेने सोडवण्यात तरबेज होता. संस्थांकडून मूळ पावत्या घेत होता. त्याचा त्यानंतर तो दुरुपयोग करत असल्याचे दिसून आले आहे. सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असून नकीब याच्या विरोधात सेक्शन 69 सीजीएसटी अॅक्ट 2017 अंतर्गत 132 (1) (बी) आणि 132 (1) (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर त्याला जेएमएफसी द्वितीय न्यायालयात हजर करण्यात आले. त्याठिकाणी आयकर विभागाचे कायदा सल्लागार वकील मुरुगेश एस. मरडी यांनी या मोठ्या घोटाळ्याची माहिती न्यायालयासमोर दिली. नकीब याने केलेल्या गुन्ह्यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले असून संबंधित संशयिताला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी जोरदार मागणी केली. त्यानुसार जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जीएसटीवर मोठा डल्ला मारण्याची बेळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना उघडकीस आली आहे. केंद्रीय जीएसटी आणि उत्पादन शुल्क मुख्य आयुक्त दिनेश पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा आयकर विभागाच्या पोलिसांनी लावला आहे. उघडकीस आलेल्या या मोठ्या घोटाळ्यामुळे जीएसटी भरणाऱ्यांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. अॅड. मुरगेश मरडी यांच्याबरोबर अॅड. इरण्णा पुजेर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
जीएसटी भरताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे
विविध उद्योजक, व्यावसायिक व संस्था मोठ्या प्रमाणात सीजीएसटी भरत असतात. आयकर विभागाकडे हा कर भरताना आयकर सल्लागाराकडून भरला जातो. मात्र तो कर भरला आहे की नाही याची माहिती उद्योजकांनी व व्यावसायिकांनी घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा प्रत्येकाने सावधानता बाळगावी, असे आवाहन अॅड. मुरगेश मरडी यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी बनावट बिलाद्वारे जीएसटी भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
बनावट बिलाद्वारे जीएसटी भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
132 कोटीच्या जीएसटीत गोलमाल : 23.82 कोटी लाटले : केंद्रीय सेवा कर-उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बेळगाव : सीजीएसटी भरताना चलाखी करत बनावट बिलाद्वारे जीएसटी भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. तब्बल 132 कोटीच्या जीएसटीमध्ये गोलमाल करत 23.82 कोटी लाटणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव येथील केंद्रीय सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाने हे प्रकरण उघडकीस आणले असून याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव नकीब नजीब मुल्ला (वय 25 […]