मालपे बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू

मालपे बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू

पूर्व घोषणा केल्याने काही गाड्या रद्द
मडगाव : पावसाचा जोर ओसरल्याने मालपे-पेडणे बोगद्यात मंगळवारी संध्याकाळपासून येणारे चिखलमिश्री पाणी कमी झाल्याने तसेच रेल्वे वाहतूक सुरू करण्यास तज्ञांनी मान्यता दिल्याने बुधवारी रात्री 8.35 वाजता बोगद्यातून पुन्हा रेलगाड्यांची वाहतूक सुरू झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा उपमहाप्रबंधक बबन घाटगे यांनी दिली. मात्र, पूर्व घोषणा केल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे मालपे-पेडणे बोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखलमिश्री पाणी येऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने गाड्याची वाहतूक बंद केली व दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर पुन्हा रेलवाहतूक सुरू झाली. त्यानंतर रात्री 10.35च्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात चिखलमिश्रीत पाणी येऊ लागल्याने पुन्हा रेलवाहतूक ठप्प झाली. बोगद्यात जमिनीतूनच चिखलमिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने ते बंद करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली कामगार कामाला लागले. त्यात बुधवारी पाऊस ओसरल्याने बोगद्यात येणारे चिखलमिश्रीत पाण्याचे प्रमाण कमी झाले व रेल वाहतूक सुरू करण्यास अभियंत्यांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर बुधवारी रात्री 8.35 वाजता रेलवाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
पुर्व घोषित रद्द करण्यात आलेल्या व वळविण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे,
रद्द करण्यात आलेल्या गाड्या : गाडी क्र. 12133 मुंबई सीएसएमटी-मंगळुऊ जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारा एक्सप्रेस प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. 22119 मुंबई सीएसएमटी-मडगाव जं. दि. 11/07/2024 रोजी सुरू होणारा तेजस एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे गाडी क्र. 10105 दिवा-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचा दि. 11/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. गाडी क्र. 16346 तिऊवनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा दि. 10/07/2024 रोजी सुरू झालेला प्रवास जो पूर्वी पुन्हा शेड्यूल करण्यात आला होता आणि आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. वळविण्यात आलेल्या गाड्या : गाडी क्र. 22633 तिऊवनंतपुरम सेंट्रल-निजामुद्दीन एक्स्प्रेसचा दि. 10/07/2024 रोजी सुरू होणारा प्रवास शोरानूर जंक्शन मार्गे वळवण्यात आला. हा प्रवास इऊगुर जं.-इरोड जं.-जोलारपेट्टाई-मेलपक्कम-रेनिगुंटा-वाडी-सोलापूर जं.-पुणे जं.-पनवेल आणि पुढील मार्गी असा असेल.
गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्सप्रेसचा दि. 09/07/2024 रोजी सुऊ झालेला प्रवास पनवेल-लोणावळा-पुणे जंक्शन मार्गे वळविण्यात आला. तो मिरज-लोंडा-मडगाव आणि पुढील मार्गी जाणार आहे. गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन : गाडी क्र. 20111 मुंबई सीएसएमटी-मडगाव जं. 10/07/2024 रोजी सुरू होणारी कोकणकन्या एक्स्प्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातून नियोजित वेळेनुसार (00.25 तास) कमी असेल आणि टेन पूर्वी धावेल. पनवेल ते सावंतवाडी रोड आणि मुंबई सीएसएमटी-पनवेल दरम्यान काही प्रमाणात रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. 12051 मुंबई सीएसएमटी-मडगाव जं. 11/07/2024 रोजी सुरू होणारी जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातून नियोजित वेळेनुसार (06.25 तास) कमी असेल आणि मुंबई सीएसएमटी-पनवेल दरम्यान अंशत: रद्द होईल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळुरू टेन क्रमांक 12619 सावंतवाडी स्थानकावर थांबवून प्रवाशांना बसद्वारे मडगाव रेल्वेस्थानकावर आणले गेले. मडगाव स्थानकावरून दुपारी 3.30 वा. प्रवासी ट्रेनद्वारे प्रवाशांना मंगळुरूला नेण्यात आले.