मुंबईकरांनो ‘या’ दिवसांत समुद्रावर जायचे टाळा

राज्यातील काही भागात मान्सूपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान असे असेल तरी मुंबईत अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाहीये. मात्र, आज मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने धोक्याचा इशारा दिला असून समुद्रात जाऊ नये तसंच, किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.  पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा उसळत आसतात.जून महिन्यात 6,7,8,23,24 आणि 25 जूनला मोठी भरती आहे. समुद्राच्या भरती दरम्यान पर्यटक मुंबईतल्या समुद्रकिनारी मोठी गर्दी करतात. यातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यापासून सावध करण्यासाठी बचाव करण्यासाठी जीवरक्षक आणि मुंबई पोलीस समुद्र किनारी तैनात करण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेवे नागरिकांना इशारा दिला आहे.  मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास 4.69 मीटर इतक्या उंचीच्या लाट उसळणार आहे. तर उद्या 7 जून आणि 8 जूनलाही साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. या दरम्यान मोठा पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईची वाहतूक खंडित होऊ शकते. या हाय-टाइटच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.  दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी पुण्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. वडगाव शेरीमध्ये एका तासात तब्बल 114 मिमी पाऊस झाला होता. शहरात इतर ठिकाणी देखील पावसानं झोडपलं अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं. मतमोजणी केंद्र देखील गुडघा lभर पाण्याने वेढल गेलं होतं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.हेही वाचा चेंबूरमध्ये सिलिंडर स्फोटात 9 जखमीमुंबईत मान्सूनपूर्व पाऊस, उकाड्यापासून दिलासा
मुंबईकरांनो ‘या’ दिवसांत समुद्रावर जायचे टाळा


राज्यातील काही भागात मान्सूपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दरम्यान असे असेल तरी मुंबईत अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाहीये. मात्र, आज मुंबईत समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने धोक्याचा इशारा दिला असून समुद्रात जाऊ नये तसंच, किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात समुद्रात उंच लाटा उसळत आसतात.जून महिन्यात 6,7,8,23,24 आणि 25 जूनला मोठी भरती आहे. समुद्राच्या भरती दरम्यान पर्यटक मुंबईतल्या समुद्रकिनारी मोठी गर्दी करतात. यातून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यापासून सावध करण्यासाठी बचाव करण्यासाठी जीवरक्षक आणि मुंबई पोलीस समुद्र किनारी तैनात करण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेवे नागरिकांना इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास 4.69 मीटर इतक्या उंचीच्या लाट उसळणार आहे. तर उद्या 7 जून आणि 8 जूनलाही साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. या दरम्यान मोठा पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईची वाहतूक खंडित होऊ शकते. या हाय-टाइटच्या काळात मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन महापालिकेने केलं आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी पुण्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. वडगाव शेरीमध्ये एका तासात तब्बल 114 मिमी पाऊस झाला होता. शहरात इतर ठिकाणी देखील पावसानं झोडपलं अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं. मतमोजणी केंद्र देखील गुडघा lभर पाण्याने वेढल गेलं होतं. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं.हेही वाचाचेंबूरमध्ये सिलिंडर स्फोटात 9 जखमी
मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस, उकाड्यापासून दिलासा

Go to Source