समाज निर्मितीत प्रत्येकाने हातभार लावावा
विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर यांचे प्रतिपादन
बेळगाव : प्रत्येकाने आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन उत्तम समाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावा. आपण करीत असलेले काम निष्ठेने करावे. कन्नडबरोबरच इतर भाषाही शिकाव्यात. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे, असे विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. रविवारी कर्नाटक राज्य सरकारी मुस्लीम नोकर संघटनेचा राज्य पातळीवरील मेळावा झाला. महात्मा गांधी भवन येथे झालेल्या मेळाव्याचे उद्घाटन करून विधानसभाध्यक्ष बोलत होते. ते पुढे म्हणाले, आजच्या पिढीला मातृभाषेबरोबरच कन्नड, इंग्लीश, हिंदी, मराठीसह इतर भाषा शिकण्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदतीचे ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. आपण करीत असलेले काम प्रत्येकाने निष्ठेने करावे. संविधानाची शिकवण लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले पाहिजेत. लोकशाही व्यवस्था व मूल्ये टिकवून ठेवण्याबरोबरच एकोप्याने आपली संघटना वाढवावी. संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, आमदार राजू सेठ, संघटनेचे राज्याध्यक्ष मोहम्मद सलीम हंचिनमनी, गौरवाध्यक्ष मोहम्मदरफी पाशा, सरचिटणीस सय्यद ईस्माईल पाशा, अन्वर लंगोटी, सलीम नदाफ, अब्दुलखादर मेणसगी, महम्मद इक्बाल अम्मीनभावी, असीफ अत्तार, ए. बी. हकीम, शब्बीर अहमद तटगार, एम. एल. जमादार आदींसह संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी समाज निर्मितीत प्रत्येकाने हातभार लावावा
समाज निर्मितीत प्रत्येकाने हातभार लावावा
विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर यांचे प्रतिपादन बेळगाव : प्रत्येकाने आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन उत्तम समाज निर्मितीच्या कार्यात हातभार लावावा. आपण करीत असलेले काम निष्ठेने करावे. कन्नडबरोबरच इतर भाषाही शिकाव्यात. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे, असे विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. रविवारी कर्नाटक राज्य सरकारी मुस्लीम नोकर संघटनेचा राज्य पातळीवरील मेळावा झाला. महात्मा […]