इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचे क्रिकेटपटू सध्या भारतात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विविध संघांकडून खेळत आहेत. दरम्यान 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या राष्ट्रीय संघासाठी पाक बरोबर चार सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे. या मालिकेत दाखल होण्यास इंग्लंडच्या खेळाडूंना मंडळाकडून आदेश पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधील इंग्लंडच्या खेळाडूंना ही स्पर्धा अर्धवट सोडत मायदेशी परतावे लागणार आहे.
मंगळवारी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 जणांचा इंग्लंडचा संघ जाहिर करण्यात आला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला इंग्लंडचा संघ पाक विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे. पाक आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेला 22 मेपासून हेडिंग्ले प्रारंभ होईल.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा जोस बटलर, कोलकाता नाईट रायडर्स संघातील फिल सॉल्ट, आरसीबी संघातील विल जॅक्स आणि टॉप्ले, चेन्नई संघातील मोईन अली त्याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील सॅम करन, बेअरस्टो आणि लिव्हिंगस्टोन यांना ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागणार आहे.
Home महत्वाची बातमी इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार
इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतणार
वृत्तसंस्था/ लंडन इंग्लंडचे क्रिकेटपटू सध्या भारतात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विविध संघांकडून खेळत आहेत. दरम्यान 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या राष्ट्रीय संघासाठी पाक बरोबर चार सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे. या मालिकेत दाखल होण्यास इंग्लंडच्या खेळाडूंना मंडळाकडून आदेश पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएल […]