श्रीपाद नाईक यांच्याकडे ऊर्जा खाते
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागलेले उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांना ऊर्जा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. रविवारी शपथविधी झाल्यानंतर काल सोमवारी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. त्यात नाईक यांना ऊर्जा खाते देण्यात आले आहे. त्यांना देण्यात आलेल्या खात्याचा गोवा राज्याला चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. नाईक प्रथम खासदार झाले तेव्हा त्यांना केंद्रीय कृषी राज्यमंत्रीपद मिळाले होते. नंतर त्यांचे खाते बदलून त्यांना केंद्रीय जहाज उद्योग राज्यमंत्री करण्यात आले होते. ठराविक अंतराने त्यांना विविध खात्यांची राज्यमंत्रीपदे देण्यात आली. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री, केंद्रीय महामार्ग राज्यमंत्री, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अशा पदांची कामगिरी त्यांनी पार पाडली. पुन्हा खासदार झाल्यावर त्यांना पर्यटन संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), संरक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) अशी मंत्रीपदे बहाल करण्यात आली. या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते केंद्रीय पर्यटन, जलमार्ग, जहाजउद्योग राज्यमंत्री होते. अनेक खात्यांचा कारभार पाहिलेल्या नाईक यांना यावेळी ऊर्जा हे नवीन खाते देण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी श्रीपाद नाईक यांच्याकडे ऊर्जा खाते
श्रीपाद नाईक यांच्याकडे ऊर्जा खाते
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागलेले उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांना ऊर्जा राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. रविवारी शपथविधी झाल्यानंतर काल सोमवारी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले. त्यात नाईक यांना ऊर्जा खाते देण्यात आले आहे. त्यांना देण्यात आलेल्या खात्याचा गोवा राज्याला चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. नाईक प्रथम खासदार झाले […]