नेदरलँड पंतप्रधान मार्क रुट होणार ‘नाटो’चे प्रमुख
सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना : युक्रेन युद्धादरम्यान रशियाला रोखणे हे मोठे आव्हान
वृत्तसंस्था/ ब्रुसेल्स
नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट हे जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना ‘नाटो’चे महासचिव होणार आहेत. महासचिवपदाच्या शर्यतीत त्यांची स्पर्धा रोमानियाचे पंतप्रधान क्लॉस इओहानिस यांच्याशी होती. मात्र, गेल्या आठवड्यातच रोमानियन पंतप्रधानांनी आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर मार्क रुट यांचा महासचिव होण्याचा मार्ग मोकळा झाला.
मार्क रुट यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. रशिया-युक्रेन युद्धासारखे मोठे आव्हान या संघटनेसमोर असताना ते ‘नाटो’चे महासचिव बनणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ते जेन्स स्टोल्टनबर्ग यांची जागा घेतील. स्टोल्टनबर्ग यांचा 10 वर्षांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. मार्क रुट यांची महासचिवपदी निवड झाल्याबद्दल सोल्टनबर्ग यांनी बुधवारी त्यांचे अभिनंदनही केले.
‘नाटो’मध्ये महासचिव हे सर्वात महत्वाचे पद
‘नाटो’मधील महासचिव किंवा सरचिटणीस हा आंतरराष्ट्रीय नागरी सेवक असतो. ते नाटोच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष असतात. याशिवाय संस्थेच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांची भूमिका निर्णायक असते. याशिवाय, त्यांच्याकडे संस्थेचे प्रवक्ते आणि आंतरराष्ट्रीय कर्मचारी प्रमुख म्हणूनही जबाबदारी असते. मार्क रुट यांना महासचिव म्हणून अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यापैकी रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला वेळेवर मदत करणे हे त्यांचे पहिले आव्हान आहे. याशिवाय ही लष्करी संघटना मजबूत करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. अलीकडच्या काळात नाटो देशांमधील समन्वय कमी होत चालला आहे. मार्क या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाटोमधील सहभागासाठी युक्रेन आग्रही
जुलैमध्ये लिथुआनियामध्ये नाटो परिषद होणार असून त्यामध्ये युक्रेन युद्ध आणि नाटो एकता याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. झेलेन्स्की नाटोमध्ये सामील होण्याच्या मागणीचा वारंवार पुनऊच्चार करत आहेत. युक्रेन नाटोचे सदस्य बनण्यास तयार असल्याचे झेलेन्स्की यांनी अनेकदा सांगितले असून ते सदस्य देशांशी चर्चा करत आहेत. युद्धाच्या काळात युक्रेनला नाटो संघटनेत समाविष्ट करण्यास जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका तयार नाहीत. असे केल्याने रशियाचा रोष आणखी वाढेल, अशी भीती या देशांना आहे.
नाटो म्हणजे काय?
► ‘नाटो’ चे पूर्ण नाव नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असे आहे. ही युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांची लष्करी आणि राजकीय युती आहे.
► 4 एप्रिल 1949 रोजी ‘नाटो’ची स्थापना झाली अहॅन त्याचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे.
► ‘नाटो’च्या स्थापनेवेळी अमेरिकेसह 12 देश त्याचे सदस्य होते. आता 29 युरोपियन आणि दोन उत्तर अमेरिकन देशांसह 31 सदस्य राष्ट्रे आहेत.
► ‘नाटो’ देश आणि त्यांच्या लोकसंख्येचे संरक्षण करणे ही या संघटनेची सर्वात मोठी जबाबदारी आहे.
Home महत्वाची बातमी नेदरलँड पंतप्रधान मार्क रुट होणार ‘नाटो’चे प्रमुख
नेदरलँड पंतप्रधान मार्क रुट होणार ‘नाटो’चे प्रमुख
सर्वात शक्तिशाली लष्करी संघटना : युक्रेन युद्धादरम्यान रशियाला रोखणे हे मोठे आव्हान वृत्तसंस्था/ ब्रुसेल्स नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट हे जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना ‘नाटो’चे महासचिव होणार आहेत. महासचिवपदाच्या शर्यतीत त्यांची स्पर्धा रोमानियाचे पंतप्रधान क्लॉस इओहानिस यांच्याशी होती. मात्र, गेल्या आठवड्यातच रोमानियन पंतप्रधानांनी आपले नाव मागे घेतले होते. त्यानंतर मार्क रुट यांचा महासचिव होण्याचा मार्ग […]