अपुऱ्या बससेवेमुळे सांबरा भागातील बसेसचे वेळापत्रक कोलमडले

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर-नोकरदारांवर परिणाम वार्ताहर /सांबरा राज्य परिवहन मंडळाच्या अपुऱ्या बस व्यवस्थेमुळे सांबरा भागातील बसेसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व नोकरदारांवर होत आहे. सध्या मोफत बससेवेमुळे महिलांचा बसने प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक पाहता महिलांना मोफत बस प्रवासाची योजना दिल्यानंतर त्यामानाने ज्यादा बसेसचीही सोय करणे गरजेचे होते. सध्या बसेस अपुऱ्या पडत […]

अपुऱ्या बससेवेमुळे सांबरा भागातील बसेसचे वेळापत्रक कोलमडले

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर-नोकरदारांवर परिणाम
वार्ताहर /सांबरा
राज्य परिवहन मंडळाच्या अपुऱ्या बस व्यवस्थेमुळे सांबरा भागातील बसेसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व नोकरदारांवर होत आहे. सध्या मोफत बससेवेमुळे महिलांचा बसने प्रवास करण्याचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक पाहता महिलांना मोफत बस प्रवासाची योजना दिल्यानंतर त्यामानाने ज्यादा बसेसचीही सोय करणे गरजेचे होते. सध्या बसेस अपुऱ्या पडत असल्याने उपलब्ध असलेल्या बसेसवर याचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी व इतर प्रवाशांना बसमध्ये थांबूनच बेळगावपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे.
दरवाजावर थांबून प्रवास
एक बस गेली की दुसरी बस लवकर मिळणार नसल्याने विद्यार्थी वर्ग बसच्या दरवाजावर थांबून धोकादायक प्रवास करत आहेत. अशातच बसथांब्यावर विद्यार्थी व महिला दिसल्या की बसचालक बसथांब्यावर न थांबवता पुढे सुमारे चारशे पाचशे फूट अंतरावर थांबवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी वर्गांची गैरसोय होत आहे. यासाठी बेळगाव-सांबरा मार्गावर जादाच्या बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Go to Source