‘डिजिटल की’ लॉकमुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम
बेळगाव : महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाल्यानंतर आता कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सर्वच कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘डिजिटल की’ लॉकमुळे हा परिणाम झाल्याचे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत. सध्या ऑनलाईन पद्धतीनेच महानगरपालिकेतील बहुसंख्य कामे केली जात आहेत. ऑनलाईनसाठी आयुक्तांच्या नावाने ‘डिजिटल की’ काढले जाते. त्यामध्ये संपूर्ण नोंदी केल्या जातात. त्याला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतरच ते काम पूर्ण होत असते. त्यामुळे सर्व नोंदी, तसेच सर्वसामान्य जनतेला देण्यात येणारे दाखले वेळेत दिले जात होते. मात्र आता आयुक्त अशोक दुडगुंटी यांची इतरत्र बदली झाली आहे. त्यामुळे हे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. ट्रेड लायसेन्स, इमारतींना देण्यात येणारी परवानगी, पीआयडी क्रमांक यासह इतर सर्वच कामे थांबली आहेत. त्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही ऑनलाईन पद्धतीने नोंद केली तरी त्यामधून कोणताच दाखला मिळेनासा झाला आहे. आता नवीन आयुक्तांच्या नावाने ‘डिजिटल की’ काढल्यानंतरच या कामांना सुरुवात होणार आहे.
Home महत्वाची बातमी ‘डिजिटल की’ लॉकमुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम
‘डिजिटल की’ लॉकमुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम
बेळगाव : महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाल्यानंतर आता कामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सर्वच कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘डिजिटल की’ लॉकमुळे हा परिणाम झाल्याचे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सांगत आहेत. सध्या ऑनलाईन पद्धतीनेच महानगरपालिकेतील बहुसंख्य कामे केली जात आहेत. ऑनलाईनसाठी आयुक्तांच्या नावाने ‘डिजिटल की’ काढले जाते. […]
